सोन्याची कवटी असलेला १५ लाखांचा आयफोन

मुंबई: आयफोनचं क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाही. अनेकजण आपल्याला हवा तसा आयफोन बनवून म्हणजेच कस्टमाइज करून घेताना दिसतात. यात अनेक सेलिब्रिटींचा देखील समावेश आहे. फोन जरी कस्टमाइज करता आला नाही तर भन्नाट कव्हर वापरून ही हौस पूर्ण केली जाते. 'गोल्डन कॉन्सेप्ट' ही स्वीडनची कंपनी वेगवेगळे कस्टमाइज आयफोनसाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीनं आतापर्यंत अनेक महागडे आयफोन डिझाइन केले आहेत. या कंपनीनं नुकताच डिझाइन केलेला एक आयफोन सध्या चर्चेत असून १८ कॅरेट सोनं आणि १००हून अधिक हिऱ्यांचा वापर करून हा फोन तयार करण्यात आला आहे. त्यामुळं हा आयफोन किंमतीनंही तितकाच महाग आहे. याची किंमत तब्बल १५ लाख रुपये इतकी आहे. 'शुगर स्कल एडिशन' हे 'गोल्डन कॉन्सेप्ट' ने बनवलेल्या महागड्या फोनपैकी एक आहे. हा फोन विकत घेण्यासाठी आयफोन प्रेमी यासाठी वाट्टेल ती रक्कम मोजायलाही तयार आहेत. या खास फोनवर काही कारागिरांनी स्वत:च्या हाताने कवटीची डिझाइन कोरली आहे. ही कवटीची डिझाइन १८ कॅरेटच्या ११० ग्राम सोन्यापासून बनवण्यात आलं आहे. यात मौल्यवान हिऱ्यांचा देखील वापर करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या सर्वात महाग आयफोनच्या यादीत या फोनला स्थान मिळालं आहे. या फोनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मगरीच्या कातडीपासून बनवलेलं बॅक कव्हर. या फोनवर एका वर्षाची वॉरंटी देण्यात आली असून ३० दिवसांची रिर्टन पॉलिसी या फोनसोबत मिळणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Mb8CU9

Comments

clue frame