मोबाइलवर लाइव्ह पाहा 'चांद्रयान २'चे प्रक्षेपण

मुंबई 'चांद्रयान- २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी अंतराळ यानाचे प्रक्षेपण काही तासांवर येऊन ठेपले आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून होणारे 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण मोबाइल आणि कॉम्प्युटरवर लाइव्ह पाहता येणार आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची संधी इस्रोने उपलब्ध करून दिली आहे. आज दुपारी २ वाजून ४३ मिनिटांना 'चांद्रयान-२' चे प्रक्षेपण होणार आहे. जगभरातील सर्वच भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण असणार आहे. मोबाइल, कॉम्प्युटरमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी चांगले इंटरनेट कनेक्शन असावे. इस्रो या प्रक्षेपणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग आपल्या ट्विटर आणि फेसबुक पेजवर करणार आहे. त्याशिवाय दूरदर्शनवरही याचे थेट प्रक्षेपण होणार आहे. दूरदर्शनच्या युट्युब चॅनेलवर 'चांद्रायन-२'चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहता येणार आहे. दूरदर्शन युट्युब चॅनेलवर दुपारी २ वाजून १० मिनिटांपासून चांद्रायन प्रक्षेपणाचे लाइव्ह स्ट्रीमिंग दाखवणार आहेत. इथे दिलेल्या व्हिडिओ लिंकवरही चांद्रायन-२ चे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणाचे उद्दिष्ट आहे. चंद्रापासून ३० किलोमीटर इतक्या अंतरावर गेल्यानंतर 'चांद्रयान-२'ची गती कमी करण्यात येणार आहे. विक्रमला चंद्राच्या भूमीवर उतरवणे अतिशय आव्हानात्मक असणार आहे. हीच शेवटची १५ मिनिटे महत्त्वाची ठरणार आहेत. भारत पहिल्यादाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर आहे ३ लाख ८४ हजार किलोमीटर इतके. चंद्रयान-२ द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील. चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर 'विक्रम' उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल. त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल. त्यानंतर ६ ते ७ सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल. लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल. रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे ४ तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल. नंतर पुढील १५ मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2SrpK9e

Comments

clue frame