टिकटॉक अॅपवर येणार व्हाट्सअॅपचे खास फिचर

नवी दिल्ली 'टिकटॉक' अॅपवर लवकरच व्हॉट्सअॅपचा एक नवा खास फिचर घेऊन येणार आहे. या फिचरच्या मदतीने युझर्स व्हिडिओ थेट आपल्या मित्रांना व्हाट्सअप शेअर करू शकतो. हा फिचर टिकटॉकवर याआधीही होता, मात्र या फिचरमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. या व्यतिरिक्त टिकटॉकवर डिस्कव्हर टॅब, लिंक अकाउंट सारखे फिचरही येत आहेत. यामुळे टिकटॉक वापरण्याची मजा आणखी वाढणार आहे. येतोय डिस्कव्हर टॅब टिकटॉक आपल्या अॅप युझर्ससाठी एक डेडिकेटेड बटन देणार आहे. या बटनामार्फत हे अॅपवर मनोरंजनाचे आशय शोधण्यास मदत करेल. टिकटॉक हा नवा फिचर जेन मॉन्चुन वॉन्ग यांनी शोधला होता. व्हाट्सअप शेअर करण्यासाठी नवं फिचर डिस्कव्हर टॅब व्यतिरिक्त युझर्संना टिकटॉकवर येत्या काही दिवसात नवीन फिचर पाहायला मिळणार आहे. या नव्या फिचरद्वारे टिकटॉक युझर्स आपले व्हिडिओ थेट आपल्या व्हाट्सअप मित्रांना शेअर करु शकणार आहे. व्हिडिओची माहितीया फिचर द्वारे युझर्स एखादा व्हिडिओ किती वेळा डाउनलोड आणि लाइक केला याची माहिती मिळणार आहे. याव्यतिरिक्त टिकटॉक युझर्स आपलं प्रोफाइल गुगल आणि फेसबुक अकाउंटशी लिंक करु शकतो. लवकर होणार प्रदर्शित या ट्विट्स च्या आधारावर टिकटॉकवर अनेक नवे फिचर येणार आहे. टिकटॉक कंपनी हे सर्व एक-एक नवे फिचर लॉंच करणार आहे. मात्र याबद्दल कोणीही अधिकृतरित्या भाष्य केले आहे. तज्ञांच्या मते हे फिचर चीन आणि भारत या दोन देशात लॉंच करण्याची शक्यता आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yhgnyn

Comments

clue frame