मुंबई लोकांच्या नजरा चुकवून तुम्ही ऑनलाइन पाहत असाल आणि तुम्हाला वाटत असेल की कोणाचेही लक्ष नाही, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. तुमच्या ऑनलाइन पॉर्न पाहण्याचा डेटा फेसबुक आणि गुगलसह इतरही टेक कंपन्यांकडे जात असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर तुम्ही incognito मोडमध्ये पॉर्न पाहत असाल तर तुम्हाला ट्रॅक केले जात आहे. मायक्रोसॉफ्ट आणि युनिव्हर्सिटी ऑफ पेन्नसिलव्हॅनिया अॅण्ड कार्नेगी मेलॉनच्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. या दरम्यान त्यांनी फक्त वयस्करांसाठी असलेल्या जगभरातील २२ हजार ४८४ वेबसाइट्स स्कॅन केल्या. यातील जवळपास सर्वच वेबसाइट युजर्सचा डेटा अन्य ठिकाणी फॉरवर्ड करत असल्याचे आढळून आले. यातील ९३ टक्के वेबसाइट्स थर्ड पार्टी अॅप कंपन्यांना सरासरी सात डोमेनसह युजर्सची माहिती शेअर करत आहेत. फक्त १७ टक्के वेबसाइट्स एनक्रिप्शनचा वापर करत असल्याचेही संशोधनात आढळून आले. या ९३ टक्के वेबसाइट्समध्ये ७४ टक्के पॉर्न वेबसाइट्सना गुगल आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्या ट्रॅक करत होत्या. सॉफ्टवेअर कंपनी ऑरकेलदेखील २४ टक्के पॉर्न साइट्सना कव्हर करत असल्याचे आढळून आले. इतकेच नव्हे तर फेसबुकदेखील दर १० पैकी १ एका पॉर्नसाइटला ट्रॅक करताना आढळले. संशोधक डॉ. मॅरीस यांनी सांगितले की, पॉर्न पाहणे हे युजर्सची खासगी बाब आहे. अशाप्रकारे ट्रॅक करणे चुकीचे आहे. फक्त १७ टक्के वेबसाइट्स प्रायव्हसी पॉलिसी फॉलो करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या पद्धतीने युजर्सना ट्रॅक केले जात आहे. त्यावरून युजर्ससाठी ही चिंतेची बाब असल्याचे ही त्यांनी नमूद केले. युजर्सचा ट्रॅक केलेला डेटाचे गुगल आणि फेसबुक काय करतात याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. या डेटाचा वापर जाहिरात प्रोफाइल डेव्हलप करण्यासाठी केला जात असल्याचे तज्ञांचे मत आहे. दरम्यान, गुगलच्या प्रवक्त्यांनी आपली युजर्सचा डेटा ट्रॅक होत असल्याचा इन्कार केला आहे. मुळातच वयस्करांसाठी असलेल्या सर्व वेबसाइट्सवर गुगल जाहिरात दाखवण्याच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. फेसबुकनेही ट्रॅकिंग करत असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JU8GFj
Comments
Post a Comment