नवी दिल्ली: ट्रेन आणि बसमधील गर्दीची माहिती देणारं फीचर लाँच केल्यानंतर आता गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे? याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत गुगलनं ४५ हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर अॅड केली आहेत. देशभरातील १७०० शहरांमधील सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर मार्क केली आहेत. मॅप्स अॅपवर 'पब्लिक टॉयलेट्स नीयर मी' या नावाने हे फीचर असेल. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. यूजर्सना बाइक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. हे फीचर आयओएस आणि अँड्रॉइड अशा दोन्ही डिव्हाइसवर उपलब्ध असेल. या फीचरच्या मदतीने बाइक उपलब्ध आहेत की नाहीत, याची माहिती यूजर्सना मिळू शकेल. यासाठी गुगलनं आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशिप केली आहे, असं कंपनीनं सांगितलं. या फीचरची गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये चाचणी घेतली होती. याआधी गुगलनं भारतात मॅप्सवर रिडिझाइन एक्स्प्लोर टॅब, फॉर यू एक्सपिरिअन्स आणि डायनिंग ऑफर्स हे तीन नवीन फीचर लाँच केले होते. त्यामुळं यूजर्सना जवळपासचे रेस्तराँ, पेट्रोल पंप, एटीएम,ऑफर्स, शॉपिंग, हॉटेलं आणि केमिस्टची माहिती मिळते.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Lqjf68
Comments
Post a Comment