नवी दिल्ली 'रेडमी नोट ७ प्रो' () चा आज पुन्हा एकदा सुरू झाला आहे. फ्लिपकार्ट आणि एमआयच्या ऑनलाइन वेबसाइटवरून हा फोन खरेदी करता येऊ शकणार आहे. आज दुपारी १२ वाजता या फ्लॅश सेलला सुरुवात झाली आहे. या फोनच्या विक्रीवर कंपनीकडून अनेक ऑफर्स दिल्या आहेत. ब्लॅक, रेड आणि ब्लू या तीन रंगात हा फोन उपलब्ध आहे. हा फोन खरेदी करणाऱ्या एअरटेल ग्राहकांना १०० टक्के अतिरिक्त डेटा मिळणार आहे. २४९ रुपयांच्या रिचार्जवर २ जीबीऐवजी ४ जीबी डेटा, ३४९ रुपयांच्या रिचार्जवर ३ जीबीऐवजी ६ जीबी डेटा मिळणार आहे. म्हणजेच ग्राहकांना ११२० जीबीचा डेटा मिळू शकणार आहे. तसेच ग्राहकांना एअरटेल प्रीमियमचा अॅक्सेसही मिळू शकणार आहे. जिओच्या ग्राहकांना डबल डेटासह २४०० रुपयांचा कॅशबॅक व्हाऊचर दिला जाणार आहे. Redmi Note 7 Pro ची वैशिष्ट्ये >> ६.३ इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले >> सुरक्षेसाठी ५ गोरिल्ला ग्लासचा बॅक-फ्रंट >> कोलकॉम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर >> फोटोग्राफीसाठी दोन कॅमेरे >> पहिला ४८ मेगापिक्सलचा कॅमेरा >> दुसरा ५ मेगापिक्सलचा कॅमेरा >> ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेज >> ४जीबी रॅमची किंमत १३ हजार ९९९ रुपये >> ६ जीबी रॅमची किंमत १६ हजार ९९९ रुपये
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ljhV98
Comments
Post a Comment