गुगल, फेसबुकवर कर आकारण्याचा केंद्राचा विचार?

बेंगळुरूः गुगल, आणि यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर कर आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेतला जाण्याची शक्यता आहे. गूगल, फेसबुक आणि ट्विटर या कंपन्यांची महसूल निश्चिती आणि ग्राहक मर्यादा निश्चित करण्याची तयारी केंद्र सरकारने सुरू केली असून, भारतातून मिळणाऱ्या नफ्यावर या कंपन्यांना भरावा लागू शकतो, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारकडून 'सिग्निफिकंट्स इकॉनॉमिक प्रेझेंस' ही संकल्पना मांडण्यात आली होती. या संकल्पनेचा समावेश प्रत्यक्ष कर कायद्यात करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. यासंबंधीचा प्रस्ताव लवकरच केंद्रीय वित्त मंत्रालयाला सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास बड्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर कर आकारणी करू शकते. भारतातून मिळणाऱ्या ऑनलाइन जाहिरातींमधून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बड्या कंपन्या मोठ्या प्रमाणावर कमाई करतात आणि कमी प्रमाणात कर भरतात, असा आरोप आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर करण्यात येतो. स्थानिक पातळीवर भरघोस उत्पन्न घेणाऱ्या आणि त्यातून नफा मिळवणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांवर जागतिक स्तरावरील अनेक देश कर आकारण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये यूरोपीय देशांमधील संख्या अधिक आहे. स्थानिक पातळीवर उत्पन्न आणि नफा या दोन्ही गोष्टींवर हा कर आकारण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारकडूनही याची चाचपणी केली जात आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YzDXCH

Comments

clue frame