'रेडमी के २०' आणि 'के २० प्रो'चा आज सेल; या आहेत ऑफर

मुंबई मागील आठवड्यात लाँच झालेल्या आणि के २० प्रो या मोबाइलची आज पहिली विक्री होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट, 'एमआय'ची वेबसाइट आणि शाओमीच्या स्टोअरवर फोन विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. या फोनच्या खरेदीवर काही खास ऑफरही देण्यात आली आहे. याआधी हे दोन्ही फोन काही ग्राहकांना अल्फा सेलमध्ये उपलब्ध करून देण्यात आले होते. रेडमी के २० या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपयांपासून सुरू होत असून के २० प्रो या फोनची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. या दोन्ही फोनवर लाँच ऑफर उपलब्ध आहे. फोन खरेदीवर एअरटेलच्या ग्राहकांना डबल डेटा फायदा मिळणार आहे. डबल डेटाच्या फायद्यासाठी ग्राहकांना २४९ किंवा २९९ रुपयांचा प्लान रिचार्ज करावा लागणार आहे. त्याशिवाय एअरटेल थँक्स गोल्डचाही फायदा मिळणार आहे. तर, आयसीआयसीआय बँकच्या ग्राहकांना या फोन खरेदीवर एक हजार रुपयांची थेट सवलत मिळणार आहे. असा आहे 'रेडमी के २०' फोनमध्ये १०८०x२३४० पिक्सल रिझोल्यूशन असलेल्या ६.३९ इंचाचा अमोल्ड डिस्प्ले आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. १२८ जीबी पर्यंत इंटनर्ल स्टोरेज वेरिएंट असणाऱ्या मोबाइलमध्ये ६ जीबी रॅम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७३० एसओसी प्रोसेसर आहे. फोनमध्ये अॅण्ड्रॉइड ९ पायवर आधारीत एमआययूआय १० आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स५८२ सेंसर असणारा ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि ८ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेंसर आहे. त्याशिवाय फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता ४००० एमएएच इतकी आहे. ' ' ची वैशिष्ट्ये स्नॅपड्रॅगन ८५५ एसओसी प्रोसेसर असलेल्या फोनमध्ये ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनचा डिस्प्ले ६.३८ इंचाचा आहे. हा डिस्प्ले एचडी+अमोल्ड असणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये सोनी आयएमएक्स५८२ सेंसर असणारा ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी, १३ मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर आणि ८ मेगापिक्सलचा टर्शिअरी सेंसर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी २० मेगापिक्सलचा पॉप अप कॅमेरा आहे. फोनची बॅटरी क्षमता ४००० एमएएच इतकी आहे. फोनमध्ये २७ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Y96Rco

Comments

clue frame