नवी दिल्ली कंपनीनं भारतात सर्वांना परवडेल असा बजेटमधील स्मार्टफोन रियलमी ३ आय () फोन लाँच केला आहे. नवी दिल्लीतील एका खास कार्यक्रमात हा फोन लाँच केला असून या फोनची किंमत केवळ ७ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनसोबतच कंपनीनं रियलमी एक्स हा फोनही लाँच केलाय. डायमंड रेड, ब्लॅक आणि ब्लू या तीन रंगात हा फोन लाँच केला आहे. रियलमी ३ आय या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ७ हजार ९९९ रुपये इतकी तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. Realme 3i ची वैशिष्ट्ये >> ६.२२ इंचाचा एचडी प्लस नॉच डिस्प्ले >> मीडिया हिलिओ पी६० प्रोसेसर >> ३ जीबी रॅम प्लस ३२ जीबी स्टोरेज >> ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेज पर्याय >> ड्युअल रियर कॅमेरा सेटअप >> १३ मेगापिक्सस प्लस २ मेगापिक्सल कॅमेरा >> १३ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा >> ४२३० एमएएच क्षमतेची बॅटरी
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NYv8Cs
Comments
Post a Comment