नवी दिल्ली: जिओ गीगाफायबरला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनं ब्रॉडबँड प्लानमध्ये मोठे बदल केले आहेत. कंपनीनं सर्वच्या सर्व ब्रॉडबँड प्लानमध्ये बदल केले असून, यामुळं ग्राहकांना अधिक डेटा आणि फायदा मिळणार आहे. टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, बीएसएनएलनं जवळपास सर्व ब्रॉडबँड प्लान बदलले आहेत. त्यात भारत फायबर ब्रॉडबँडच्या दोन यशस्वी प्लानचाही समावेश आहे. एका प्लानमध्ये ७७७ रुपयांचे मासिक रेंटल आणि ५०० जीबी डेटा दिला जातो. त्यात बदल केल्यानंतर या प्लानची किंमत ८४९ रुपये झाली आहे. त्यात ६०० जीबी डेटा मिळणार आहे. विशेष म्हणजे सबस्क्राइब केल्यानंतर मोफत अमर्यादित कॉल करता येऊ शकतात. ५०Mbps स्पीडनं मिळणाऱ्या या प्लानची एफयूपी मर्यादा संपल्यानंतर स्पीड २Mbps होणार आहे. बीएसएनएलचा दुसरा प्लान ३,९९९ रुपयांचा आहे. त्यात बदल केला असून, तो ४,४९९ रुपयांना मिळणार आहे. याआधी १०० Mbpsच्या स्पीडनं रोज ५० जीबी डेटा मिळत होता. आता ५५ जीबी डेटा मिळणार आहे. तसंच मोफत अमर्यादित कॉलिंग आहे. ADSL प्लानमध्येही बदल बीएसएनएलनं एडीएसएल प्लानमध्येही बदल केले आहेत. २९९ रुपयांना मिळणाऱ्या BB CUL प्लानमध्ये याआधी ग्राहकांना ८Mbpsच्या स्पीडनं रोज १.५ जीबी डेटा मिळत होता. आता तो वाढवून रोज २ जीबी केला आहे. प्लानची किंमत वाढवून ३४९ केली आहे. स्पीड मात्र, तितकाच राहणार आहे. प्लान सबस्क्राइब करणाऱ्या ग्राहकांना ६०० रुपयांच्या ऑफ-नेट कॉलचा लाभ घेता येणार आहे. ब्रॉडबँड पोर्टफोलियोमध्येही अनेक नवीन प्लानचा समावेश केला आहे. नव्या प्लानमध्ये ५९९ रुपयांचा एक प्लान आहे. त्यात ग्राहकांना १० Mbpsच्या स्पीडनं रोज ४ जीबी डेटा देण्यात येत आहे. दुसरा ६९९ रुपयांचा प्लान आहे. त्यात १० Mbpsच्या स्पीडनं रोज ५ जीबी डेटा दिला जाणार आहे. २४ तासांसाठी अमर्यादित कॉलची ऑफरही देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त १० Mbps स्पीड आणि २४ तासांसाठी अमर्यादित कॉलिंग असलेले अनेक नवीन प्लान सुरू केले आहेत. ८९९ रुपये -१२ जीबी, १२९९ रुपये- २२ जीबी, १५९९ रुपये -२५ जीबीचे प्लान आहेत.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2IY4t3U
Comments
Post a Comment