मुंबई : मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये अव्वल असलेल्या व्हॉट्सअॅपमध्ये युजर्सला दर्जेदार सुविधा देण्यासाठी सतत नवीन फिचर अपडेट केले जातात. आता पुन्हा काही फिचर्स आणणार असल्याचं समजतंय. या फिचर्सला यूजर्सची भरपूर पसंती मिळेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जाणुन घेऊया व्हॉट्समध्ये दाखल होणाऱ्या या पाच नव्या फिचर्स विषयी.... डार्क मोड हे फिचर व्हॉट्समध्ये येणार याची चर्चा खूप दिवसांपासून होत होती. डार्क मोड चालू केल्यावर ऐरवी पांढरं असणारं व्हॉट्सअॅपमधलं बॅकग्राउंड गडद राखाडी रंगाचं दिसू लागेल. तसंच, चॅट आयकॉन्स आणि त्यावरची नावं हिरव्या रंगात बदलतील. रात्रीच्या अंधारात मोबाईल प्रकाशामुळे डोळ्यांना होणारा त्रास या फिचरमुळे कमी होईल. हाइड ऑनलाइन स्टेटस व्हॉट्सअॅपच्या चालू व्हर्जनमध्ये यूजरला स्वतःचा लास्ट सीन हाइड म्हणजेच लपवता येतो. पण यूजर ऑनलाइन आल्यावर त्याचा स्टेटस ऑनलाइन असा दिसू लागतो. आता हा ऑनलाइन स्टेटस सुद्धा लपवण्याचं फिचर व्हॉट्सअॅपमध्ये येणार आहे. यामुळे यूजरचं स्वतःच्या खासगीपणावरचं नियंत्रण वाढेल. फुल साइज इमेज व्हॉट्सअॅपवरून फोटो पाठवताना त्या फोटोचा दर्जा आणि त्याचं रिसोल्यूशन कमी होतं. त्यामुळे यूजर्स फोटो शेअर करण्यासाठी व्हॉट्सअॅप ऐवजी अन्य अॅप्सचा वापर करतात. पण आता व्हॉट्सअॅपमध्ये होणाऱ्या बदलामुळे फोटो पाठवताना त्याचा दर्जा कमी होणार नाही. क्रॉस प्लेटफॉर्म बैकअप व्हॉट्सअॅपमधला डेटा सुरक्षित राहावा यासाठी बॅकअपचा पर्याय दिलेला आहे. पण फोनची प्रणाली अॅंड्रॉइड मधून आयओएस मध्ये जात असेल तर बॅकअप करता येत नाही. पण नवीन फिचरमुळे एका प्लॅटफॉर्म मधून दुसऱ्या प्लॅटफॉर्म मध्येही डाटा वॅकअप शक्य होइल. गुगल पे, फोन पे सारखं अर्थिक व्यवहाराची सुविधा 'व्हॉट्सअॅप पे' उपलब्ध करून देईल. पैसे पाठवणे, बिल भरणे, रिचार्ज करणे आणि सोबतच चॅटही करणं असं सगळं एकाच अॅपमध्ये आल्यावर यूजर्स इतर अॅपकडे नक्कीच पाठ वळवतील.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2WWZl8W
Comments
Post a Comment