मुंबई कोणतीही रेंज नसताना, इंटरनेट नसतानाही कॉल करता येईल असं अद्भूत तंत्रज्ञान ओप्पो कंपनीने विकसित केलं आहे. मेश टॉक असं या नवीन तंत्रज्ञानाचे नाव असून सध्या तरी तीन किमीपर्यंतच्या अंतरांवर असलेल्या मोबाइललाच या तंत्रज्ञानाच्या मदतीने कॉल करता येणार आहे. शांघायच्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये ओप्पोने या तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. जगात असे अनेक दुर्गम भाग आहेत जिथे रेंज, ब्लुटूथ, इंटरनेट काहीच काम करत नाही. अशाठिकाणी इतर जगाशी संपर्क तुटतो. पण ओप्पोच्या नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने रेंज,इंटरनेट ,ब्लुटूथ हे काही नसतानाही कॉल ,टेक्स्ट मेसेज करता येणार आहे. मात्र हे तंत्रज्ञान केवळ ओप्पोच्या मोबाइल्ससाठीच विकसित करण्यात आलं आहे. तसंच सध्यातरी केवळ तीन किमीच्या अंतरावर असलेल्याच मोबाइलवर मेशटॉकने कॉल करता येणार आहे. मेशटॉकसाठी मोबाइलमध्ये एक चिप बसवली जाणार आहे. ही चिप मोबाइलमधील डिसेंट्रलायझेशन, वेगवान गती आणि कमी बॅटरीचा वापर करेल. ही चिप ज्या मोबाइल्समध्ये बसवली जाईल त्याच मोबाइल्सवर या चिपचा वापर करता येईल. पण ओप्पोच्या विद्यमान मोबाइलमध्ये ही चिप बसवता येईल की नाही याबद्दल मात्र साशंकता आहे.यासाठी मोबाइलच मॉडेलचे अपडेटेड व्हर्जन ओप्पो बाजारात आणेल असा अंदाज वर्तवला जातो आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KEIz84
Comments
Post a Comment