बेंगळुरू: यूजरना आकर्षित करून त्यांची संख्या वाढवण्यासाठी पेमेंट आणि फूड डिलिव्हरी कंपन्यांनी अॅपवर गेम सुरू केले आहेत. क्रिकेट वर्ल्डकपदरम्यान अॅपचे सबस्क्राइबर वाढवण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न आहे. क्रिकेट कप, स्विगी मॅच डे मेनिया, पेटीएम गेम्स आणि ''s Tez Shots' हे इन-अॅप गेम दिसू लागले आहेत. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे गेम लाँच केल्यानं यूजर अधिक वेळ अॅपवर राहतील. पेमेंट, फूड डिलिव्हरीसारख्या ट्रांझेक्शनल अॅपसाठी हे फायद्याचे आहे. मोबाइल गेमिंग कंपनी नजारा टेक्नॉलॉजीजचे अधिकारी मनीष अग्रवाल यांनी सांगितलं की, कॉन्टेंट-लेड एंगेजमेंट फीचरमुळं हे अॅप बाजारात इतरांच्या तुलनेत वेगळे ठरताहेत. झोमॅटोनं प्रीमिअर लीग आणि क्रिकेट कपसारखे गेम सुरू केले आहेत. हे गेम विशेषतः छोट्या शहरांमध्ये झोमॅटो आणि फर्स्ट टाइम यूजरमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण करण्यात महत्वाची भूमिका निभावतात. फर्स्ट टाइम यूजर पदार्थ ऑर्डर करण्याबरोबरच क्रिकेट सामने पाहता-पाहता निकालाचे अंदाज वर्तवणाऱ्या ऑफरचाही आनंद लुटतात, असं झोमॅटोच्या प्रवक्त्यांनी सांगितलं. पेटीएमनंही ग्राहकांना फर्स्ट कॅप्टन ऑफर दिली आहे. रोज ६० टक्के ग्राहक हा गेम खेळतात. गुगल पेद्वारे तेज शॉट्स हा व्हर्च्युअल मोबाइल क्रिकेट गेम आहे. या गेममुळं अॅपवर एंगेजमेंटची संख्या वाढत आहे. अनेक चित्रपटांची मोफत तिकीटे, विमानांची तिकीटे आणि अन्य वस्तूंसाठी ग्राहक अनेक फ्री गेममध्ये भाग घेतात. त्यामुळं अॅपला क्रॉस सेल वाढवण्यासाठी एक वेगळं व्यासपीठ मिळतं, असं पेटीएम फर्स्ट गेम्सचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सुधांशु गुप्ता यांनी सांगितलं. पेटीएमच्या माहितीनुसार, त्यांचे ७० टक्के ग्राहक रोज गेम खेळतात.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XdlafH
Comments
Post a Comment