'गुगल कॅलेंडर'मार्फत होतेय तुमच्या पैशांची चोरी

नवी दिल्ली : वाढत्या इंटरनेट वापरामुळे लोकांचे पैसे चोरण्यासाठी जगात स्कॅमर्सचा सुळसुळाट झाला आहे. या स्कॅमर्सनी लोकांचे पैसे चोरण्यासाठी अनेक मार्ग शोधून काढले आहेत. त्यामुळे स्कॅमर्स हे मालवेअर, खोटे पेज आणि काही वेळा स्कॅमर्स थेट बॅंक माहितीच्या आधारे पैसे चोरतात. सध्या काही स्कॅमर्सनी लोकांच्या बँक खात्यातून पैसे चोरण्याचा नवा मार्ग शोधून काढला असून, हे स्कॅमर्स ''चा वापर करून पैसा चोरण्यासाठी करत आहेत. गुगल कॅलेंडरची डिफॉल्ट सेटिंग 'गुगल कॅलेंडर' या अॅपचे लाखो वापरकर्ते आहेत. कित्येकजण या अॅपचा वापर करत नसले,तरी अॅप त्यांचा अँड्रॉइड मोबाइलमध्ये असतो. या गुगल कॅलेंडरमध्ये एक डिफॉल्ट सेटिंग फिचर असते. हा फिचर अॅटोमॅटीक इनव्हिटेशन अॅड करते. सेटिंग पर्यायातून घेतला जातो गैरफायदा मोबाइल युझर्सना फसवण्यासाठी स्कॅमर्स या सेंटिगचा वापर करत आहे. यासाठी स्कॅमर्स हे युझर्सना काही कॉन्टेस्ट जिंकण्यासाठी खोटे इनव्हिटेशन पाठवतात. त्यानंतर युझर्स हे इनव्हिटेशन गुगल कॅलेंडरच्या शेड्युलमध्ये अॅड करतात. यामुळे मेसेज युझर्सला पॉप-अप नोटिफिकेशनप्रमाणे वारंवार स्क्रिनवर येतात. त्यात युझर्स बक्षिस जिंकण्याच्या मोहापायी साइन-अप करून आपल्या बँक डिटेल्स देतात. युझर्सचा डोळेझाक विश्वास नडतो गुगल कॅलेंडरकडून आलेल्या नोटिफिकेशन्सला युझर्स विश्वासनीय मानून बक्षिस जिंकण्यासाठी लिंकवर क्लिक करतो. त्यात आपण बँक डिटेल्स भरल्यास, ताबडतोब त्या डिटेल्स स्कॅमर्सकडे पोहोचतात. त्यानंतर स्कॅमर्स डिटेल्सच्या आधारावर बँक खात्यातून पैसा काढून घेतात. फक्त पैसे नाही, तर ते आपल्या सोशल मीडियावरील अकाउंटचीही माहिती मिळवून गैरवापर करतात. काय आहेत यावर उपाय ? या स्कॅमपासून सुरक्षित राहायचे असेल, तर सर्वातआधी गुगल कॅलेंडर ओपन करावे लागेल. त्यानंतर स्क्रिनच्या वर डाव्या बाजूस गिअर आयकॉन दिसेल. त्यात इव्हेंट सेटिंगमध्ये जाऊन 'ऑटोमेटिक अॅड इनव्हिटेशन' हा पर्याय बदलू शकतात. नंतर 'नो' हा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर तुम्हाला फक्त त्याचे इनव्हिटेशन दिसेल, त्याला प्रतिसाद द्या. त्यानंतर खालच्या बाजूस जाऊन 'शो डिक्लाइन इवेंट्स'वर 'अनचेक' करावे लागेल. त्यानंतर नोटिफिकेशनचे पॉप-अपलाही आळा घालू शकता.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2NfClgQ

Comments

clue frame