मुंबई टेलिकॉम कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे प्रत्येक कंपनी ग्राहकांसाठी दरवेळेस नवीन प्लान लाँच करतात. वोडाफोनने आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी २२९ रुपयांचा प्लान आणला आहे. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणार असून इतरही फायदे देण्यात आले आहेत. वोडाफोनच्या नवीन प्रीपेड प्लानसाठी २२९ रुपयांच्या प्लानमध्ये अनलिमिटेड लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलिंगसह दररोज १०० फ्री एसएमएस मिळणार आहे. तर, २८ दिवसांची वैधता असणाऱ्या प्लानमध्ये युजर्सना दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. त्याशिवाय युजर्सना वोडाफोन प्ले अॅपही मोफत उपलब्ध असणार आहे. यामध्ये युजर्सना लाइव्ह टीव्ही आणि चित्रपट पाहता येतील. हेच फायदे वोडाफोनच्या २५५ रुपयांच्या प्लानमध्ये आधी ऑफर करण्यात येत होते. आता त्याच प्लानची किंमत कमी करण्यात आली आहे. दरम्यान, वोडाफोनने आणखी एक फिल्मी प्लान लाँच केला आहे. ऑनलाइन चित्रपट आणि शो पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा खास प्लान आहे. या प्लानमध्ये युजर्सना एक जीबी ३जी/४जी डेटाची ऑफर आहे. मात्र, या प्लानमध्ये एसएमएस अथवा कॉलिंगसाठी कोणत्याही प्रकारची ऑफर नाही.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2X3kX3k
Comments
Post a Comment