फोल्डेबल फोन्सच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्टचं पदार्पण

मुंबई : फोल्डेबल फोन्सकडे मोबाईल विश्वाचे भविष्य म्हणून पाहिले जाते. मोबाईल क्षेत्रातल्या अनेक कंपन्या आपापले फोल्डेबल फोन्स लॉन्च करण्याच्या तयारीत असताना मायक्रोसॉफ्टनेही कंबर कसली आहे. जून २०२० पूर्वी हा फोन लॉन्च करेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. काही अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार २०२० च्या पहिल्या तीन महिन्यात मायक्रोसॉफ्ट हा फोन लॉन्च करेल. ४:९ या गुणोत्तरात या फोनचा ९ इंचाचा डिस्प्ले विभागला जाईल. मायक्रोसॉफ्ट सर्फेस विंडोज १० या ऑपरेटिंग प्रणालीच्या नवं व्हर्जन विंडोज कोर ओएस या फोनमध्ये बसवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे. या प्रणालीचं वैशिष्ट्य असं की यात सर्व अँड्रॉइड अॅप्स आणि आयक्लाउड सर्व्हिसेसही काम करू शकतात. मायक्रोसॉफ्ट फोल्डेब फोन मध्ये भरपूर आकर्षक फिचर्स असतील. एलटीई कनेक्टिव्हिटीसह ५जी यात उपलब्ध असेल. सॅमसंग, हुवावे यासारख्या जगातल्या जवळपास सगळ्याच मोठ्या कंपन्या फोल्डेबल फोन्सवर काम करत आहेत. अश्या दर्जेदार कंपन्या स्पर्धात असताना मायक्रोसॉफ्टच्या फोनला किती पसंती मिळेल हे बघणे मनोरंजक ठरेल.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2IGBOjG

Comments

clue frame