फोल्डेबल फोन्सच्या स्पर्धेत मायक्रोसॉफ्टही!

मुंबई : फोल्डेबल फोन्सकडे मोबाईल विश्वाचे भविष्य म्हणून पाहिले जाते. मोबाईल क्षेत्रातल्या अनेक कंपन्या फोल्डेबल फोन्स लॉन्च करण्याच्या तयारीत असताना मायक्रोसॉफ्टही या स्पर्धेत उतरणार आहे. आपला फोल्डेबल डिव्हाइस पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत लाँच करणार असल्याची शक्यता आहे. मायक्रोसॉफ्टच्या या फोल्डेबल डिव्हाइसमध्ये ९ इंचाचे दोन डिस्प्ले असणार आहेत. मायक्रोसॉफ्ट सर्फेस विंडोज १० चे नवं व्हर्जन विंडोज कोर ओएसवर काम करणार आहे. या डबल डिस्प्लेच्या युजर इंटरफेस चांगले होण्यासाठी नवीन विंडोज ओएस वापरण्यात आले आहे. हा नवीन ओएस इंटेल १० एनएम एसओसी लेकफिल्ड प्रोसेसरवर काम करेल. मायक्रोसॉफ्टच्या या फोल्डेबल डिव्हाइसमध्ये सर्व अॅण्ड्राइड अॅप्स आणि आयक्लाउड सर्व्हिसही काम करू शकणार आहेत. त्याशिवाय यामध्ये एलटीई आणि ५जी असणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मायक्रोसॉफ्ट ड्युअल स्क्रीन मोबाइल लाँच करणार असल्याची बातमी होती. मात्र, हा डिव्हाइस मोबाइल वाटत नाही. दरम्यान, मायक्रोसॉफ्टने आपल्या नव्या डिव्हाइसबाबत भाष्य करणे टाळले आहे. सॅमसंग, हुवावे यांसारख्या जगातल्या जवळपास सगळ्याच मोठ्या कंपन्या फोल्डेबल फोन्सवर काम करत आहेत. याच स्पर्धेत मायक्रोसॉफ्ट ही उतरल्यामुळे ग्राहकांना अधिक पर्याय उपलब्ध असणार आहेत.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2X6PTzG

Comments

clue frame