'या' मोबाइलमध्ये सेल्फी कॅमेरा आहे पण दिसत नाही!

मुंबई चीनमधील मोबाइल कंपनी ओप्पो एक खास नवा मोबाइल लाँच करणार आहे. हा फोन खास असणार आहे. लाँच होणाऱ्या मोबाइलमध्ये सेल्फी कॅमेरा तर असणार आहे. मात्र, तो दिसणार नाही. या फोनचा कॅमेरा इनडिस्प्ले असणार आहे. शांघाई येथे होणाऱ्या वर्ल्ड मोबाइल काँग्रेसमध्ये हा मोबाइल आज लाँच करण्यात येणार आहे. ओप्पोने आपल्या नव्या मोबाइलचे नाव अद्याप जाहीर केले नाही. मात्र, या फोनचे नाव 'ओप्पो फाइंड वाय' असणार असल्याची चर्चा आहे. हा फोन 'ओप्पो फाइंड एक्स'चा सक्सेसर मोबाइल असणार आहे. याआधीदेखील कंपनीने एक व्हिडिओ ट्विट केला होता. या व्हिडिओत फोनचा वरील भाग दिसतो. मात्र, त्यात फ्रंट कॅमेरा दिसत नाही. फोनमध्ये कॅमेरा सुरू करताच त्यात सेल्फी कॅमेरा अॅक्टिव्हेट झालेला दिसतो. तर, दोन दिवसांपूर्वी ओप्पोने आणखी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या ट्विटमुळे फोनची उत्सुकता आणखी वाढली. या व्हिडिओतही फोनच्या मॉडेलचे नाव स्पष्ट करण्यात आले नाही. 'ओप्पो फाइंड एक्स'मध्ये अनेक खास फिचर्स होते. या फोनमध्ये ही अशाच प्रकारची खास हटके फिचर्स असण्याची शक्यता आहे. दरम्यान, शाओमीनेदेखील इनडिस्प्ले कॅमेरा फोन लाँच करण्याची घोषणा केली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Jbj6A1

Comments

clue frame