मुंबई गुगलचे आजच्या दिवसाचे डूडल खास आहे. २१ जून हा वर्षातला सर्वात असतो. खगोलशास्त्रीय दृष्टीकोणातून महत्त्वाच्या दिवसासाठी गुगलने खास डूडल तयार केले आहे. समर सोल्सटाइस म्हणून आजचा दिवस साजरा करतात. काही देशांमध्ये आजचा दिवस सणांसारखाही साजरा करतात. सोल्सटाइस हा ऋतू बदलण्याचे प्रतिक आहे. गुगलच्या डूडलमध्ये पृथ्वी दाखवण्यात आली असून तिच्या डोक्यावर नारळाचे झाड आणि एक आसन दाखवण्यात आले आहे. समर सोल्सटाइसमध्ये पृथ्वीवरील एका भागात उन्हाळा तर एका भागात हिवाळा सुरू होतो, हे या डूडलमधून दर्शवण्यात आला आहे. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो. प्रत्येक देशात सुर्यप्रकाश असण्याचे तास वेगवेगळे असतात. काही देशांमध्ये १२ तासांहून अधिक वेळ सुर्यप्रकाश असतो. काही देशांमध्ये आजपासून उन्हाळा सुरू होतो. तर काही देशांमध्ये उन्हाळा संपल्याचे समजले जाते. दक्षिण गोलार्धातील देशांमध्ये आज मोठी रात्र असते.
from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2x9s37i
Comments
Post a Comment