'आसूस ६झेड'चा आज सेल; या आहेत खास ऑफर्स

मुंबई 'आसूस ६ झेड' या मोबाइलची आज दुपारी १२ वाजल्यापासून विक्री होणार आहे. हा फोन फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार असून खास ऑफरही देण्यात आल्या आहेत. या फोनचा कॅमेरा खास असून तो रिअर कॅमेरा फ्लिप होऊन सेल्फीसाठी वापरता येतो. त्याशिवाय या फोनची मेमरी मायक्रोएसडी कार्डद्वारे तब्बल एक टीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. काही दिवसांपूर्वीच हा फोन भारतात लाँच करण्यात आला होता. भारताबाहेर हा फोन 'आसूस झेनफोन ६' या नावाने लाँच झाला आहे. 'आसूस ६झेड' सध्या ऑनलाइन एक्सक्लुझिव्ह असल्यामुळे शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टवरुन खरेदी करता येणार आहे. ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज वेरिएंट असलेल्या मोबाइलची किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत ३४ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या वेरिएंटची किंमत ३९ हजार ९९९ रुपये आहे. फ्लिपकार्टवर या फोनच्या खरेदीवर ऑफर्स देण्यात आल्या आहेत. हा स्मार्टफोन खरेदी केल्यास फ्लिपकार्टकडून ३९९९ रुपयांचा मोबाइल प्रोटेक्शन प्लान हा अवघ्या ९९ रुपयांना उपलब्ध आहे. त्याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट अथवा क्रेडिट कार्डने खरेदी केल्यास ईएमआयवर ५ टक्के अधिक सवलत उपलब्ध असेल. त्याशिवाय अॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डवरून हा फोन खरेदी केल्यास ५ टक्के सवलत मिळणार आहे. ही आहेत 'आसूस झेड६' ची वैशिष्ट्ये '६झेड' मध्ये ६.४ इंचाचा आयपीएस एलसीडी एफएचडी डिस्प्ले आहे. स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर असून फोन ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम या दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध होणार आहे. फोनमध्ये ५००० एमएएच बॅटरी क्षमता असून १८w क्विकचार्ज ४.० सपोर्ट आहे. ४८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा पॉप अपसह बाहेर येतो आणि रोटेट होऊन फ्रंट कॅमेऱ्याचेही काम करतो. लिक्विड मेटलचा वापर करून फ्लिप कॅमेरा बनवण्यात आला आहे. फोटो काढत असताना मोबाइल कॅमेरा हातातून पडल्यास पॉप अप स्वत:हून बंद होत असल्याचा दावा कंपनीने केला आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KD2sMz

Comments

clue frame