मुंबई : एखादा मेसेज कुठुनही कुठेही झटकन पोहचवणारं मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपमध्ये पुन्हा एकदा एका नव्या फिचरची भर पडतेय. व्हॉट्सअॅपवर अपडेट केलेला स्टेटस तसाच्या तसा फेसबुक स्टोरीजमध्ये शेअर करण्याचं फिचर व्हॉट्सअॅपमध्ये येणार आहे. स्टेटसवरून फोटो, व्हिडिओ किंवा टेक्स शेअर करता येतात. हे स्टेटस फोनमधील सर्व कॉन्टॅक्टसना दिसतं. २४ तासानंतर आपोआपच स्टेटस डिलीट होतो. आता व्हॉट्सअॅपवर टाकलेला स्टेटस फेसबुकसोबतच इंस्टाग्राम, जीमेल आणि गुगल फोटोसवरही पोस्ट करता येईल. व्हॉट्सअॅप गेल्या अनेक दिवसांपासून या फिचरवर काम करत असून नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार फिचर टेस्टिंगसाठी तयार झालं आहे. हे फिचर सध्यातरी फक्त व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर उपलब्ध असेल. विशेष म्हणजे, हे फिचर वापरण्यासाठी व्हॉट्सअॅप आणि फेसबुक अकाउंट्स एकमेकांशी जोडण्याची गरजही पडणारी नाही. टेस्टींगसाठी बीटा व्हर्जनमध्ये हे फिचर आजपासूनच उपलब्ध होईल. फिचर अधिकृतरित्या लॉन्च झाल्यावर व्हॉट्सअॅप स्टेटसखाली 'शेअर टू फेसबुक स्टोरी' असा पर्याय दिलेला असेल. हे नवं फिचर लॉन्च करताना यूजर्सच्या खासगीकरणाची व्हॉट्सअॅपने खास काळजी घेतली आहे. यूजरच्या सुरक्षेसाठी 'डेटा शेअरींग एपीआय'ची मदत घेतली जाणार आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2KIHz2v
Comments
Post a Comment