लेनोव्हो लवकरच आणणार ५जी लॅपटॉप

चीन शांघाय येथे सुरु असलेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये लेनोव्होने जगातील पहिला ५जी लॅपटॉप लॉंच करणार असल्याची घोषणा केली आहे. या लॅपटॉपमध्ये पहिल्यांदाच पाचव्या जनरेशनचा वापर केला जाणार आहे. यासोबत फाइव्ह जीवर चालणारा झेड सिक्स प्रो एक्सप्लोरर अॅडिशन स्मार्टफोनचीही घोषणा करण्यात आली आहे. मोबाइल काँग्रेसमध्ये नव्यानेच येऊ घातलेल्या '' तंत्रज्ञानावर भरपूर चर्चा झाली. चीनमधील अनेक कंपन्यांनी फाइव्ह जीवर सादरीकरण केलं. त्याचवेळी लेनोव्होने फाइव्ह जीवर चालणारा लॅपटॉपची घोषणा केली. या लॅपटॉपमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरही असणार आहे. या लॅपटॉपचे इतर महत्त्वाचे फिचर्स मात्र गुलदस्त्यात आहेत. येत्या काळात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता अजून वाढणार असल्याचं यामुळे स्पष्ट झालं आहे. यासोबतच लेनोव्हो झेड सिक्स प्रो एक्स्प्लोरर अॅडिशन स्मार्टफोनचीही घोषणा करण्यात आली आहे. या मोबाइलमध्ये स्नॅपड्रॅगन ८५५ प्रोसेसर देण्यात आलं आहे तर स्नॅपड्रॅगन एक्स ५० मॉडेमही देण्यात आलं आहे. ६.३९ इंची अॅमोलेड डिस्प्लेच्या स्मार्टफोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचही देण्यात आला आहे. त्यासोबतच या मोबाइलमध्ये स्टॅंडर्ड झे६ प्रो आणि ४००० एमएएच बॅटरीही देण्यात आली आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Je7fRL

Comments

clue frame