मुंबई : पत्ता शोधण्याबरेबरच आपसापची चांगली हॉटेल्स शोधणे, प्लंबर, इलेक्ट्रिशियन यांसारख्या रिपेर्ंग व्यवसायिकांशी संपर्क करणे यासारख्या कामांसाठीही गुगल मॅप्सचा वापर केला जातो. पण, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार गुगल मॅप्सवरील फेक अकाउंट्समुळे स्कॅम होण्याचा धोका वाढला आहे. गुगल मॅपवर एखाद्या व्यवसायाची नोंदणी करायची असल्यास पोस्टकार्ड किंवा कॉलद्वारे न्युमरिकल कोड गुगल वेबसाइटपर्यंत पोहोचवावा लागतो. नोंदणी केल्यानंतर व्यवसायासंबंधी सर्च केले असता त्या व्यवसायाशी संपर्क करता येतो. मात्र, गुगलच्या या सुरक्षा यंत्रणेला चुकीचा पत्ता आणि फोन नंबर देऊन सहज हुलकावणी देता येते. त्यामुळे फेक अकाउंट्सची संख्या वाढते आणि याचा मोठा परीणाम रियल अकाउंट्स आणि ग्राहकांना बसतो. प्रत्येक महिन्याला अशी हजारो काढली जातात. सध्या मॅप्सवरील फेक अकाउंट्सची संख्या १ कोटी १० लाखांवर जाऊन पोहोचली आहे. २०१७ साली खुद्द गुगलने प्रसिद्ध केलेल्या एका अहवालानुसार मॅप्सवर एखादी गोष्ट सर्च केल्यावर येणाऱ्या रिझल्ट्स पैकी फक्त ०.५ टक्के व्यवसाय फेक असतात. मात्र द वॉल स्ट्रीट या नियतकालीकानुसार ०.५ टक्कापेक्षा जास्त अकाउंट्स फेक असतात. मॅप्सवरील सर्च रिझल्टमध्ये २० पैकी १३ सर्चेसमध्ये चुकीचा पत्ता दिलेला असतो आणि २० पैकी केवळ दोन व्यवसाय पुर्णपणे सुरक्षित असतात, असे या अहवालात सांगितले आहे. गुगलमध्ये हे फेक व्यवसाय सहज टिकून राहतात. कारण याचा वापर शक्यतो घाई असताना केला जातो. अशावेळी यूजर्सकडे हे व्यवसाय सुरक्षित आहेत की नाही हे तपासायला वेळ नसतो.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2X144kV
Comments
Post a Comment