गुगल क्रोमशी स्पर्धा करणार 'ब्रेव्ह' ब्राउझर

: २०० कोटी युजर्स असणारं ब्राउझर ''शी स्पर्धा करण्यासाठी 'ब्रॅव्ह ब्राउझर' लॉंच करण्यात आला आहे. जाहिराती आणि कुकीज ऑटोमॅटिक ब्लॉक करणे हे लॉंच केलेल्या ब्राउझरचे वैशिष्ट्य आहे. हा ब्राउझर युजर्सना जाहिरात पाहण्याचाही पर्याय देतो. तसेच, युजर्संनी ब्राउझरवरील जाहिरातींवर क्लिक केल्यास त्यांना पैसेही मिळतात. या ब्रेव्ह ब्राउझरवरील जाहिराती पाहणाऱ्या युजर्संना रेव्हेन्यूचा ७० टक्के हिस्सा मिळतो. तर शिल्लक ३० टक्के हे ब्राउझरच्या डेव्हलपर्संना मिळतात. ब्रेव्हने जाहिरातीच्या माध्यमातून ऑनलाइन जाहिरातीची संपूर्ण पद्धत बदलत असल्याचे कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले आहे. ब्रेव्ह एक ओपन सोर्स क्रोमियमवर आधारित ब्राउझर आहे. या ब्राउझरमध्ये स्पीड, सुरक्षित ब्राउझिंग आणि जलद नेविगेशन असल्याने गुगल क्रोमलाही मागे टाकले आहे. चांगल्या सर्विसमुळे ब्रेव्ह मोझिला फायरफॉक्स नंतर बेस्ट ब्राउझर बनला आहे. या यादीत अॅपल सफारी हे तिसऱ्या क्रमांकावर आणि गूगल क्रोम चौथ्या स्थानावर आहे. ही यादी 'toptenreviews.com'या साइटने क्रमांकवारी जारी केली आहे. ब्रेव्हने २०१८ साली आयओएस लाँच केला होता. तसेच, अँड्रॉइडबरोबर मॅकओएस, विंडोज आणि लिनक्सही उपलब्ध आहे. हे ब्राउझर युझर्सच्या डेटा स्टोर करत नाही. तसेच प्रायव्हेसी सेटिंग कस्टमाइज करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे.


from Computer News in Marathi: Latest Computer Technology Updates in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2JdUmH5

Comments

clue frame