मुंबई काही महिन्यांआधी व्हॉट्स अॅपने विंडोज फोनमध्ये अॅप सुरू राहणार नसल्याचे सांगितले होते. आता, व्हॉट्स अॅपने युजर्सना आणखी एक धक्का दिला आहे. पुढील वर्षापासून काही अॅण्ड्रॉईड मोबाइल आणि आयफोनवर सुरू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. एक फेब्रुवारी २०१९ पासून या फोनवर व्हॉट्स अॅप सपोर्ट करणार नाही. व्हॉट्स अॅपच्या FAQ मध्ये याबाबतची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. अॅण्ड्रॉईड २.३.७ या ओएसमध्ये सर्व अॅण्ड्रॉईड फोन आणि आयओएस ७ या ओएसवर चालणाऱ्या आयफोनमध्ये व्हॉट्स अॅप १ फेब्रुवारी २०२० पासून बंद होणार आहे. या ओएसवर चालणाऱ्या फोनमध्ये व्हॉट्स अॅप अकाउंट बनवता येऊ शकत नाही आणि रि-वेरिफायही करता येणार नसल्याचे व्हॉट्स अॅपने स्पष्ट केले आहे. या निर्णयाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणावर होणार नसल्याचेही व्हॉट्स अॅपने म्हटले आहे. खूप जुने अॅण्ड्राइड फोन वापरणारे आणि आयफोन वापरणाऱ्या युजर्सवर याचा परिणाम होईल. मात्र, ही संख्या फार मोठी नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. व्हॉट्स अॅपने अॅण्ड्रॉईड ४.०.३ हे व त्यानंतरचे सॉफ्टवेअर व्हर्जन असलेले आणि आयफोनच्या आयओएस ८ नंतरचे व्हर्जन असलेले फोन वापरण्याचे आवाहन केले आहे.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Lk7TzM
Comments
Post a Comment