प्ले स्टोअरवर २००० पेक्षा अधिक फेक अॅप्स

मुंबई गुगल प्ले स्टोअरवर दोन हजाराहून अधिक आहेत. या बनावट अॅप्सचा वापर युजर्सची माहिती चोरी करण्यासाठी, वायरस पसरवण्यासाठी होत असल्याची संशय व्यक्त करण्यात आला आहे. टेंपल रन, फ्री फ्लो, हिल क्लाइंब रेसिंगसारख्या गेमिंग अॅपचे फेक व्हर्जन प्ले स्टोअरवर उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. युनिर्व्हसिटी सिडनी अॅण्ड सीएसआयआरओ डेटा ६१ च्या दोन वर्षाच्या अभ्यासात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या अभ्यासात १.२ मिलियन अॅप्सचा अभ्यास करण्यात आला होता. अॅप्सची ओळख हे अॅप्स खरे की खोटे हे ओळखणे कठीण असल्याचे ही या अभ्यासात म्हटले आहे. बहुतांशी अॅप इन्स्टॉल केल्यानंतर ओळखणे शक्य आहे. मात्र, इन्स्टॉल केल्याशिवाय हे बनावट अॅप्स ओळखळे कठीण असल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. मालवेअर हल्ल्याची भिती बनावट अॅपचा वापर युजर्सचा डेटा चोरी करण्यासाठी आणि मालवेअर हल्ल्यासाठी करण्यात येतो. अशी बनावट अॅप्स डाउनलोड केल्यामुळे युजर्सना आर्थिक नुकसानही सहन करण्याची भिती असल्याचे अभ्यासात म्हटले आहे. कोणत्याही अॅपने गुगलच्या नियमांचे भंग केल्यास अशा अॅपना प्ले स्टोअरमधून हटवण्यात येत असल्याची माहिती गुगलच्या प्रवक्त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिली. २०४० बोगस अॅप्स सध्या प्ले स्टोअरवर असलेल्या १० हजार टॉप अॅप्सशी साधर्म्य असलेले २०४० अॅप्स आढळून आलेत. अभ्यास करण्यात आलेल्या अॅप्सपैकी ४९ हजार ६०८ अॅप्सचा हेतू हा मालवेअर हल्ला करण्याचा होता. तर, १५६५ अॅप्स अॅक्सेस करण्यासाठी विशिष्ट परवानगी मागत होते. अशाप्रकारची विशेष परवानगी खरे अॅप्सदेखील मागत नसल्याचे समोर आले.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Fz1bC3

Comments

clue frame