ट्विटरने 'टॅग'मधून हटवला 'हा' पर्याय

मुंबई:'' या लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून दररोज अनेक गोष्टी ट्विट केल्या जातात. हे ट्विट करताना संबंधित विषयाच्या टॅगिंगसाठी ट्विटरनं काही पर्याय दिले आहेत. त्यातील ''चाही पर्याय हटवण्याचा निर्णय ट्विटरनं घेतला आहे. मोबाइल युजर्ससाठी हा पर्याय यापुढं उपलब्ध नसेल, असं ट्विटरनं एका ट्विटद्वारे स्पष्ट केलंय. युजर्सला ''चा पर्याय देणारं हे फिचर २००९ पासून सुरू करण्यात आलं होतं. हा पर्याय निवडल्यानंतर डेस्कटॉपवरून हे फिचर वापरताना यूजरला स्वतःला ठिकाणाचं नाव लिहावं लागत असे. मात्र, मोबाइलवर जीपीएस असल्यानं तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अचूक (प्रिसाइस) लोकेशन आपोआपच दिसू शकतं. लोकेशनचं फिचर उपलब्ध करून देण्यामागे युजर्सना ट्विटर उघडल्यावर कोणतेही ट्विट्स दिसण्यापेक्षा फक्त आसपासच्या भागातून केलेले ट्विट्स दिसावेत, असा या फिचरचा मूळ हेतू होता. मात्र, ट्विटरवर हॅशटॅग्स आणि लोकप्रिय ट्विटर अकाउंट्सने जोर धरल्यामुळे हे फिचर मागे पडलं. 'प्रिसाइस लोकेशन'चा फारसा वापर होत नव्हता. त्यामुळं हे फिचर बंद करण्यात येणार असल्याचं ट्विटरनं म्हटलंय. असं असलं तरी ट्विटरच्या अपडेटेड कॅमेरा मधून 'प्रिसाइस लोकेशन' शेअर करणे शक्य होणार आहे. याशिवाय, डेस्कटॉप पद्धतीनुसार मोबाइलमध्येही मॅन्युअली लोकेशन शेअर करण्याचा पर्याय उपलब्ध असणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2RoaWbb

Comments

clue frame