मुंबई ओप्पोचा सबब्रॅण्ड '' या स्मार्टफोनची आज दुपारी १२ वाजल्यापासून विक्री होणार आहे. हा फोन फ्लिपकार्ट आणि रिअलमीच्या वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे. बजेटमध्ये असणाऱ्या या फोनच्या याआधीच्या सेलला ग्राहकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. 'रिअलमी सी २' मोबाइलच्या २ जीबी रॅम व १६ जीबी इंटर्नल स्टोरेजच्या वेरिएंटची किंमत ५९९९ रुपये आहे. तर, २ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत ६९९९ रुपये आणि ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेज असलेल्या मोबाइलची किंमत ७९९९ रुपये आहे. २ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेजच्या वेरिएंटची घोषणा कंपनीने मागील आठवड्यात केली होती. 'रिअलमी सी २' हा मोबाइल देशभरातील आठ हजार ऑफलाइन स्टोअरमधून खरेदी करता येईल. या सेलमध्ये ऑफरही देण्यात आल्या आहेत. रिअलमीच्या वेबसाइटवरून हा फोन खरेदी केल्यास एक हजार रुपयांपर्यंतचा सुपरकॅश कॅशबॅक मिळणार आहे. त्याशिवाय स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांना जिओकडून ५३०० रुपयांची ऑफर आहे. फ्लिपकार्टवरून फोन खरेदी केल्यास अॅक्सिस बँक बज क्रेडिट कार्डवर ५ टक्क्यांपर्यंत सवलत आणि नो कॉस्ट इएमआयचा पर्याय देण्यात आला आहे. 'रिअलमी सी २' ची वैशिष्ट्ये 'रिअलमी सी २' मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा १३ मेगापिक्सल आणि सेकंडरी कॅमेरा २ मेगापिक्सलचा आहे. सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये ६.१ इंचाचा डिस्पले आहे. फोनची बॅटरी क्षमता ४००० एमएचइतकी आहे. अॅण्ड्रॉइड ९ पाई ओएस आहे. या ड्युल सीम फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने २५६ जीबीपर्यंत स्टोरेज वाढवता येऊ शकते.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2Kuk7WM
Comments
Post a Comment