अॅमेझॉवर ऑनर डेज् सेल; मोबाइलवर बंपर डिस्काउंट

मुंबई ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अॅमेझॉनवर ऑनर डेज् सेल सुरू झाला आहे. हा सेल २५ जून ते २९ जून दरम्यान सुरू असणार आहे. पाच दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये ऑनरच्या फोनवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. काही फोनवर १५ हजार रुपयांची सवलत आहे. अॅमेझॉनच्या या सेलमध्ये ऑनर ९ एन, ऑनर १० लाइट आणि ऑनर ८ एक्स यासारख्या फोनवर सवलत देण्यात येत आहे. ऑनर ८ सी या फोनवर ४००० रुपयांपर्यंतची सवलत देण्यात येत आहे. या फोनची मूळ किंमत १२ हजार ९९९ रुपये आहे. सेलमध्ये हा फोन ८ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. ऑनर व्ह्यू २० या फोनवर १५ हजार रुपयांची मोठी सवलत उपलब्ध आहे. या फोनचा ८ जीबीचा वेरिएंट ३५, ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. तर, ६ जीबी वेरिएंटच्या मोबाइलवर १३ हजार रुपयांची सवलत आहे. ऑनर ८ एक्स या फोनवर पाच हजार रुपयांची सवलत आहे. ४ जीबी व ६ जीबी वेरिेएंटचा फोन सेलमध्ये अनुक्रमे १२, ९९९ आणि १४, ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. ऑनर ९ एन या फोनवर नऊ हजार रुपयांची सवलत आहे. हा फोन सेलमध्ये ८९९९ रुपयांपासून खरेदी करता येईल. तर, अन्य वेरिएंटची किंमत १० हजार ९९९ रुपये, १५ हजार ९९९ रुपये आणि १९ हजार ९९९ रुपये आहे. ऑनर प्ले सेलमध्ये या फोनवर तब्बल आठ हजार रुपयांची सवलत आहे. हा फोन १३ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2ZQPzCl

Comments

clue frame