मुंबई शाओमीने आपल्या दोन मोबाइलची सीरीजचे उत्पादन थांबवले आहेत. '' आणि 'एमआय नोट' या सीरीजच्या कोणत्याही नवीन मॉडलचे मोबाइल लाँचिंग होणार नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्या शाओमी आपल्या रेडमी, एमआय मिक्स, एमआय ९ आणि नवीन सीरिज सीसी या स्मार्टफोनवर लक्ष केंद्रित करणार आहे. शाओमीने 'एमआय मॅक्स ३' या मोबाइलला मागील वर्षी लाँच केले होते. त्यामुळे या मोबाइलचे अपडेटेड व्हर्जन येईल अशी शक्यता होती. तर, २०१७ मध्ये 'एमआय नोट ३' लाँच करण्यात आले होते. नोट सीरिजमधील हा शेवटचा मोबाइल होता. शाओमीने आपल्या नोट सीरीजचा मोबाइल पहिल्यांदा २०१५ मध्ये लाँच केला होता. शाओमीने आपल्या दोन मोबाइल सीरिजचे उत्पादन थांबवले असले तरी दुसरीकडे 'सीसी' सीरिजच्या मोबाइलसाठी खास प्रयत्न सुरू आहेत. शाओमी या सीरीजचे फोन मेतू मोबाइलच्या भागिदारीने लाँच होणार आहेत. या नव्या सीरिजचे फोन स्टाइलिश असणार असून युवकांना केंद्रस्थानी ठेवून मोबाइल लाँच करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. 'सीसी' सीरिजअंतर्गत 'एमआय सीसी९' आणि 'एमआय सीसी९ इ' लाँच करू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2xdkqg5
Comments
Post a Comment