योग दिवसानिम्मित्त अॅपलचं यूजर्सला आव्हान

मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात साजरा होत असताना कंपनीने योग दिवस साजरा करण्यासाठी एक नवीन मार्ग अवलंबला आहे. अॅपलने वॉच यूजर्सना एक आव्हान दिलंय. आज कमीतकमी १५ मिनिटे अॅपल वॉचसह योगावर्कआऊट केल्यास अॅपलकडून वॉच यूजर्सला एक खास बक्षीस देण्याची घोषणा कंपनीने केली आहे. अॅपल स्मार्टवॉच मध्ये वेळ, तारीख, वार याशिवाय यूजर्सना अनेक फिचर्स मिळतात. रोजच्या व्यायामाची नोंद करण्याची सोयही अॅपल वॉचमध्ये असते. अशाच प्रकारे योग करून, त्याची नोंद करून बक्षीस मिळवण्याची संधी अॅपलने यूजर्सना दिली आहे. या आव्हानात १५ मिनीटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ योगासने यूजरने करणं अपेक्षित आहे. हे योग वर्कआऊट अॅपल हेल्थ अॅपशी जोडल्या गेलेल्या एका अॅपमध्ये रेकॉर्ड करावं लागेल. जर अॅपलने दिलेले आव्हान पुर्ण झाले तर यूजरला बक्षीस म्हणून अॅपलची तीन अॅनिमेटेड स्टिकर्स बक्षीस मिळतील. मेसेज आणि फेसटाइम करताना या स्टिकर्सचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय, अॅपल यूजरला एक व्हर्चुअल ट्रॉफीही देणार आहे. वॉचच्या अॅक्टीव्हीटी अॅपमधील अचीवमेंट्स या भागात ही ट्रॉफी कायम झळकत राहील.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times http://bit.ly/2ZFDDDs

Comments

clue frame