हुवावे अडचणीत,स्मार्टफोनमध्ये अमेरिकन पार्ट वापरू शकत नाही

नवी दिल्ली : चीन आणि अमेरिकेमधील व्यापार युद्धाचा फटका कंपनीला बसतो आहे. अमेरिकेने चिनी कंपन्यांवर निर्बंध लादले सर्वाधिक अमेरिकन माल वापरणाऱ्या हुवावे यामुळे मोठ्या प्रमाणात तोट्यात जाण्याची शक्यता आहे. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे हुवावे अमेरिकन कंपन्यांचे तंत्रज्ञान आणि हार्डवेअर स्मार्टफोनमध्ये वापरू शकणार नाही. त्याचसोबत गुगल आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम्सचा मुक्त हस्ताने वापर हुवावेला करता येणार नाही. हुवावे फोनमध्ये वापरले जाणारे बहुतांशी पार्ट अमेरिकेमध्ये बनले आहेत. अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे हुवावेला आता या अमेरिकन पार्ट्सचाही वापर करता येणार नाही. नुकत्याच लाँच झालेला 'पी३० प्रो' फ्लॅगशिप डिव्हाइसमध्ये अमेरिकन कंपनीचे १५ आवश्यक घटक आहेत. यात नॉर्थ कॅरोलिनाची कॉर्वोचे कम्युनिकेशन सेमीकंडक्टर, मायक्रोन तंत्रज्ञानचे डीआरएएम, कॉर्निंगचे डिस्प्ले प्रोटेक्शनसह इतर आवश्यक घटक समाविष्ट आहेत. हुवावेला या १५ आवश्यक घटकांसाठी एक नवीन पुरवठादार शोधावा लागेल, जो अमेरिकन कंपन्यांसारखे गुणवत्ता घटक देईल. टोकियो मधील एका रिसर्च फर्म फॉरमॅलॉट टेक्नो सोल्युशन्सच्या अहवालानुसार, स्मार्टफोनमध्ये वापरले जाणारे ६२ घटक हे चीनच्या बाहेरील कंपन्याद्वारे बनवले जातात.अहवालात असे आढळून आले आहे की, हुवावेच्या फोनमध्ये वापरण्यात आलेले अमेरिकन घटक १% आहे. हुवावेचे 'पी३० प्रो' स्मार्टफोनमध्ये एकूण १,६३१ घटक आहेत, ज्यातील १५ घटक अमेरिकन आहेत. चीनमध्ये हुवावेच मोठ मार्केट आहे आणि २०२० च्या अखेरीस जगातील सर्वात मोठी कंपनी बनवू इच्छित होती,परंतु चीन आणि अमेरिकेदरम्यान व्यापार युद्धमुळे ते शक्य़ नाही. दरम्यान, काही अमेरिकन कंपन्यांनी ट्रम्पच्या आदेशांनुसार हुवावेला काही घटक पुरवण्यास सुरूवात केली आहे.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2NjVnCI

Comments

clue frame