गुगल मॅप्स देणार ट्रेन, बसमधील गर्दीची माहिती

नवी दिल्ली: ट्रेन, बसमधून प्रवास करणाऱ्यांच्या सोयीसाठी ''नं नवीन फीचर लाँच केला आहे. त्यामुळं प्रवाशांना ट्रेनच्या वेळा; तसंच ट्रेन आणि बसमधील गर्दीची माहिती मिळणार आहे. त्यामुळं ट्रेन आणि बसमधून दररोज प्रवास करणाऱ्यांचा काही प्रमाणात त्रास कमी होणार आहे. गुगल मॅप्सचं हे नवीन फीचर अॅंड्रॉइड आणि आयओएस यूजर्सना ट्रेनचं वेळापत्रक आणि गर्दीची माहिती मिळणार आहे. याच महिन्यात गुगल मॅप्सनं यूजर्ससाठी अनेक नवीन फीचर लाँच केले आहेत. जूनच्या सुरुवातीलाच बस आणि ट्रेनच्या वेळांची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. नव्या अपडेटसह आता रिक्षांच्या उपलब्धतेबाबतही माहिती दिली जात आहे. गुगल मॅप्सनं बस वाहतुकीसाठी 'लाइव्ह ट्रॅफिक डीले' हे नवीन फीचर आणलं आहे. ते इस्तंबूल, मनिला, जागरेब आणि अटलांटासारख्या जगातील प्रमुख शहरांत उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या फीचरच्या अचूक माहितीचा लाभ ६ कोटी यूजर्सना होत आहे. हे फीचर सर्वात आधी भारतात लाँच करण्यात आलं आहे, असं गुगलचे रिसर्च सायंटिस्ट एलेक्स फॅब्रिकँट यांनी सांगितलं.


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XcXPiY

Comments

clue frame