मानवी प्रजातींच्या सूचीमध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. या नव्या प्रजातीचे अवशेष फिलिपिन्समधील एका गुहेमध्ये सापडले आहेत. मानवी उत्क्रांतीच्या संकल्पना या नव्या शोधामुळे बदलल्या जाऊ शकतात...
मानवी अस्तित्वाचा आणखी एक पुरातन पुरावा फिलिपिन्समध्ये सापडला आहे. फिलिपिन्समधील सर्वांत मोठे द्वीप लोझोन येथील एका गुहेमध्ये मानवाच्या नव्या प्रजातीचे अवशेष सापडले आहेत. ‘होमो लुझोनेसिस’ असे त्या प्रजातीचे नामकरण करण्यात आले आहे. या प्रजातीची काही वैशिष्ट्ये काही प्राचीन मानवी प्रजातींशी आणि काही आजच्या मानवाशी साधर्म्य दाखवत असल्याचे संशोधकांचे
म्हणणे आहे.
फिलिपिन्समध्ये सापडलेली ‘होमो लुजोनेसिस’ ही प्रजाती आफ्रिकेतील प्रजातींशी संबंधित असू शकते. आफ्रिकेतून ज्या प्रजाती नंतर पूर्व आशियामध्ये स्थलांतरित झाल्या, त्यामध्ये ‘होमो लुजोनेसिस’चा समावेश असू शकेल, असे संशोधकांना वाटते. आफ्रिकेतील मानवी प्रजाती कधीकाळी पूर्व आशियामध्ये गेल्या असण्याची शक्यता नाही, असे आधी संशोधकांना वाटत होते. मात्र, या नव्या संशोधनामुळे मानवी प्रजातींमधील नव्या संबंधांची माहिती उजेडात येण्याची शक्यता आहे.
फिलिपिन्सच्या भागात याआधीच मानवाच्या तीन-चार प्रजाती राहत असल्याचे आधीच उघडकीस आले आहे. यात कमी उंचीच्या ‘हॉबिट’ किंवा होमो फ्लोरेसीन्सिस या प्रजातीचाही समावेश आहे. इंडोनेशियातील फ्लोरेस बेटावर सुमारे ५० हजार वर्षांपूर्वीपर्यंत ही मानवी जमात अस्तित्वात होती. फिलिपिन्स डिलिमन विद्यापीठातील अर्मंड मिजारेस यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी या नव्या प्रजातीचा शोध लावला आहे. त्यांचा शोध प्रबंध ‘नेचर’ या नियतकालिकात १० एप्रिलच्या अंकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.
‘होमो लुझोनेसिस’ ही प्रजाती सुमारे ५० हजार ते ६७ हजार वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होती, असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या प्रजातीच्या चार मानवांचे अवशेष संशोधकांना लोझोन येथील गुहेत सापडले आहेत. त्यात दात, हात आणि पायाच्या हाडांचा समावेश आहे. आदिम मानवापासून प्रगत मानवी प्रजातीपर्यंतचा जो प्रवास झाल्याचे मानले जाते, त्यातील काही संकल्पनांना या संशोधनाने धक्का बसला आहे. पूर्वआशियामध्ये २००४पासून सापडलेली ही तिसरी मानवी प्रजाती आहे. प्राचीन मानवाला आफ्रिकेतून पूर्व आशियामध्ये येण्यासाठी मोठा सागरी भाग ओलांडून येणे गरजेचे होते. त्यावेळच्या मानवाला सागरी प्रवाहांच्या आधारे प्रवास करण्याचे ज्ञान नव्हते, असे मानले जात होते; परंतु या नव्या संशोधनामुळे याला छेद जाऊ शकतो.
‘होमो लुझोनेसिस’ मानवाच्या हाताची आणि पायाची बोटे आतील बाजूस वळलेली होती. म्हणजेच हा मानव झाडावर राहत नसला, तरी उंच झाडांवर चढण्याची कला त्याला अवगत होती, असे सिद्ध होते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या प्रजातीच्या मानवाची काही वैशिष्ट्ये ही आताच्या मानवाशी मिळती-जुळती आहेत, तर काही वैशिष्ट्ये ऑस्ट्रलोपिथेसिन मानवाशी जुळणारी आहेत (जसे उभे राहून चालणे), तर काही आफ्रिकेत सापडलेल्या व माकडांशी साधर्म्य सांगणाऱ्या काही प्रजातींशी जुळणारी आहेत. त्यामुळे या मानवांचे आफ्रिकेत ४२ लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये असलेल्या मानवाशी नाते असावे, असे संशोधकांना वाटते.
लोझोन द्वीप हे चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे, त्यामुळे हे प्राचीन मानव येथपर्यंत पोहोचले कसे, याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. ‘होमो लुझोनेसिस’बरोबरच दक्षिण पूर्व आशियामध्ये डेनिसोवन्स या नावाची प्रजातीही सापडली आहे. या भागात आल्यानंतर ही प्रजाती होमो सेपियनसोबत मिसळून गेली, असे मानले जाते. डीएनए विश्लेषणाच्या आधारे हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. फिलिपिन्समधील संशोधनाची सुरवात २००४मध्ये करण्यात आली. त्या वेळी गुहेमध्ये केवळ चार फुटांपर्यंत खोदकाम करण्यात आले. त्यानंतर पुन्हा २००७मध्ये काम सुरू झाले. २०१५पर्यंत ते सुरू होते. त्यानंतर सापडलेल्या अवशेषांचे विश्लेषण करण्यात आले.

from News Story Feeds http://bit.ly/2GBa4uF
Comments
Post a Comment