घड्याळ शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील टेक कंपनी गॅरमिनने भारतात पहिल्यांदाच लाइफस्टाइल 'GPS' एनेबल्ड स्मार्ट वॉच लाँच केले आहे. 'गॅरमिन इंन्टिंग्ट' असे या घड्याळाचे नाव आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या घड्याळाची किंमत 26,990 रुपये इतकी आहे.
जे लोक सतत घराबाहेर कार्यरत असतात अशा लोकांसाठी या घड्याळाची निर्मिती करण्यात आली आहे. फ्लेम रेड, ग्रेफाइट आणि व्हाइट या तीन रंगांमध्ये हे घड्याळ उपलब्ध असेल. हे घड्याळ तुम्हाला गॅरमिनच्या स्टोअर्समध्ये मिळू शकते. तसेच, पेटीएम मॉल आणि ऍमझॉनवरूनही तुम्ही ते खरेदी करु शकता.
काय आहेत घड्याळाचे फिचर्स
- बॅरोमॅट्रिक ऑल्टीमीटर
- 3x - ऍक्सिस कॉम्पस आणि जीपीएसची सोय
- सीटल लोकेशन ट्रॅकिंगसाठी नव्हेगेशन सॅटेलाईटचाही सपोर्ट
- अमेरिका आणि रशियाचे सॅटेलाईट्स – GLONASS आणि गॅलिलिओचाही यात समावेश
- हार्ट सेन्सरची सोय, हा सेन्सर स्ट्रेस लेवल आणि आपले हार्ट रेट ट्रॅक करतो.
- कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या घड्याळाची बॅटरी एकदा चार्ज केल्यावर सुमारे 14 दिवस चालते.
- जीपीएस ट्रॅकिंग मोडमध्ये हे घड्याळ तुम्हाला 16 तासांपर्यंत बॅटरी बॅकअप देईल.
- पावर सेव्हींग अल्ट्राटट्रॅक मोडवर 40 तासांपर्यंत बॅटरी चालू शकते.
- 16MB मेमरी, तसेच वायरलेस सपोर्टही
- शॉक प्रूफ आणि वॉटर प्रूफ घड्याळ.
- डिस्प्ले 128x128 इतका
या व्यतिरिक्त सॉफ्टवेअर बेस्डही काही खास फिचर्स घड्याळात देण्यात आली आहेत. यात गारमीन एक्सप्लोर ऍपच्या माध्यमातून आपण पॉइंट्स, मॅप्स आपण एडीट आणि मॅनेज आणि डाऊनलोडही करु शकता. हे घड्याळ ऐडव्हेंचर करणारांसाठी खास बनविण्यात आले आहे. कंपनीने दावा केला आहे की, वातावरण खराब असेल किंवा वातावरणात अचानक बदल झाला तर ती माहितीसुद्धा हे घड्याळ देते. अमेरिकी मिलिट्री स्टँडर्डकडून या घड्याळांची चाचणी घेण्यात आली आहे.
घड्याळाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, हे घड्याळ स्मार्टफोनशी कनेक्ट करता येऊ शकते. घड्याळाच्या सहाय्याने तुम्ही कॉल घेऊ किंवा रिजेक्ट करु शकता. सोशल मीडिया आणि इस्टंट मेसेजिंग ऍप्सची नोटिफिकेशन्सही तुम्ही या घड्याळाद्वारे पाहू शकता.

from News Story Feeds https://ift.tt/2EFqjIO
Comments
Post a Comment