औरंगाबाद : सणवार आले की, मोबाईलवर मेसेज धडकायचे. नंतर लाभ उठविण्यासाठी कंपन्यांनी "ब्लॅक डे'ची टूम काढली. ही मक्तेदारी व्हॉट्सऍप मेसेंजरने आपोआपच मोडीत निघाली. यंदाच्या दिवाळीत शुभेच्छांसाठी व्हॉट्सऍप "स्टिकर' धुमाकूळ घालीत आहे. स्टिकरचे बीटा व्हर्जन निवडक लोकांकडेच आहे. इतर वापरकर्ते केवळ फॉरवर्डचा आनंद लुटत आहेत.
व्हॉट्सऍप मेसेंजरद्वारे टेक्स मेसेज, जेपीजी फॉर्मेटमध्ये डिझाईन केलेले पोस्टर, पीडीएफ फाइल यासह इमोजी, जीआयएफचा वापर व्हायचा. आता व्हॉट्सऍप स्टिकरचे बीटा व्हर्जन आले असून ते चांगलेच लोकप्रिय झाले. पीएनजी फॉर्मेटमधील चित्रे, अक्षरे ही बॅकशिवाय उमटत असल्याने लक्षवेधी ठरलीत. नवे व्हर्जन नियमित होण्यासाठी वेळ असून, ज्यांच्याकडे स्टिकरचे बीटा व्हर्जन आहे, ते टेक्स आणि पोस्टरला फाटा देत स्टिकरचाच वापर करीत आहेत.
व्हॉट्सऍपचे नियमित वापरकर्ते सध्या ते स्टिकर केवळ फॉरवर्ड करू शकत आहेत. दिवाळीच्या सुरवातीलाच हे व्हर्जन आले असून शुभेच्छांसाठी त्याचा प्रचंड वापर होतोय. व्हॉट्सऍपचे इनबॉक्स फुल्ल होत असले, तरी ते फोटो गॅलरीत सेव्ह होणार नसल्याने ती मोकळीच राहणार आहे. एरव्ही गॅलरी भरल्याने हॅंग होणारा मोबाईल यातून वाचेल. इमोजी, जीआयएफच्या रांगेत तिसऱ्या स्थानी हे स्टिकर लवकरच सहभागी होणार आहे.
बीटा व्हर्जनच झाले फुल्ल
व्हॉट्सऍपचे बीटा व्हर्जन स्वीकारायला अनेकांनी प्ले स्टोअरवर धडक मारली. मात्र, त्यांना त्या ठिकाणी "बीटा प्रोग्रॅम इज फुल्ल' असा मेसेज पाहायला मिळाला. आपणाला हवी तशी स्टिकर ऍड करून पाठविता येणार असल्याने याबाबत उत्सुकता आहे. वापरकर्त्यांना नव्या व्हर्जन अपडेटची वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नाही.
व्हॉट्सऍपचे स्टिकर हे बीटा व्हर्जन आहे. सबस्क्राईब केल्यानंतर पाच ते दहा मिनिटांत अपडेट होते. मात्र, सध्या बीटा व्हर्जन फुल्ल झाल्याने ते सबस्क्राईब करता येत नाही. नव्या व्हर्जनसाठी वापरकर्त्यांना थोडा काळ वाट पाहावी लागणार आहे.
- स्वप्नील खरे, संगणक तज्ज्ञ, औरंगाबाद

from News Story Feeds https://ift.tt/2F7fRuC
Comments
Post a Comment