पबजी या तुफान लोकप्रिय झालेल्या गेमला टक्कर देण्यासाठी आता शाओमीने मैदानात उतरत सर्व्हायव्हल गेम भारतीय गेमर्ससाठी सादर केला आहे. पबजी या मोबाईल गेमने सर्वांना वेड लावले आहे. विशेषकरून तरुणाईला हा गेम चांगलाच भावल्याचे दिसून येत आहे. भारतातही या गेमचे चाहते मोठ्या प्रमाणात असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. या अनुषंगाने पबजी मोबाईल गेमला टक्कर देण्याची शाओमीने तयारी केल्याचे संकेत आता मिळाले आहेत. या कंपनीने सर्व्हायव्हल गेम या नावाचे पबजीसारखाच गेम सादर केला आहे.
भारतीय यूझर्ससाठी याला बीटा म्हणजेच प्रयोगात्मक अवस्थेत लाँच करण्यात आले असून, कुणीही कंपनीच्या संकेतस्थळावरून याला डाउनलोड करून खेळू शकतो. पहिल्या टप्प्यात फक्त अँड्रॉइड यूझर्स याला खेळू शकतील. तथापि, लवकरच याला आयओएससाठीही सादर करण्यात येईल, असे मानले जात आहे.
अर्थात याला खेळण्यासाठी यूझरने मी कम्युनिटी प्रोफाइल तयार केलेले असावे. याशिवाय यूझरचे टेलिग्राम ॲपवर अकाउंट असण्याची अटदेखील टाकण्यात आली आहे. सर्व्हायव्हल गेममध्ये मॅप एरियाट स्पेसशिपच्या माध्यमातून उड्डाण करत प्रारंभ होतो. पबजीप्रमाणे या गेममध्येही गेमर त्याला हव्या त्या ठिकाणी उतरून शस्त्रांसह अन्य बाबींचा शोध घेऊ शकतो. अर्थात पबजीमध्ये फक्त बाइक आणि कारचे पर्याय असले तरी या गेममध्ये कुणीही यासोबत अवकाशयानातूनही विहार करू शकणार आहे. हा साय-फाय या प्रकारातील शूटिंग मोबाईल गेम असून, भारतीय यूझर्सच्या पसंतीस उतरण्याची शक्यता असल्याचा दावा शाओमीने केला आहे. तथापि, पबजीला हा गेम खऱ्या अर्थाने टक्कर देऊ शकणार का, हे तर येणारा काळच ठरवणार आहे.

from News Story Feeds https://ift.tt/2qSsgsf
Comments
Post a Comment