कोल्हापूर - अल्झायमर (स्मृतिभ्रंश) हा विकार शक्यतो वृद्धांमध्ये आढळतो. विसरभोळेपणा, भ्रामकता आदींचा यामध्ये समावेश आहे. याचा स्मरणशक्तीवर खूप परिणाम होतो. म्हणूनच जगभरातील अनेक संशोधन संस्था, विश्वविद्यालयातील वैज्ञानिक अन् डॉक्टर्स सातत्याने संशोधन करत आहेत. विशेष म्हणजे शिवाजी विद्यापीठातील जीव-रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. के. डी. सोनवणे, सागर बराले आणि सहकारी यांचे ॲमिलॉईड हायपोथेसिसवर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन करत आहेत.
डॉ. सोनवणे, श्री. बराले यांनी जागतिक पातळीवरील न्यूरोपेप्टाईडस्, अमायनो ॲसिडस्, आरएससी ॲडव्हान्स जर्नल ऑफ मॉलेक्युलर मायक्रोबायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, दि प्रोटीन जर्नल, कॉम्प्युटर इन बायोलॉजी अँड मेडिसीन, प्रोटिन अँड पेप्टाईड लेटर्स, मॉलेक्युलर बायोसिस्टमस् या नियतकालिकांमध्ये संशोधन प्रसिद्ध झाले आहे. डॉ. सोनवणे, श्री. बराले यांचे जुलै ते सप्टेंबर २०१५ च्या न्यूरोपेप्टाईडस् नियकालिकांत टॉप २५ हॉटेस्ट आर्टिकल्स्चा समावेश आहे.
याबाबत डॉ. सोनवणे म्हणाले, ‘‘अल्झायमरमध्ये कोलीनर्जीक, ताऊ, ॲमिलॉईड हायपोथेसिसचा समावेश आहे. ॲमिलॉईड हायपोथेसिसमध्ये ४० किंवा ४२ अमायनो आम्ल असणारे ॲमिलॉईड बिटा पेप्टाईड हे प्रथिन कारणीभूत ठरते. हे प्रथिन जर जास्त संख्येने एकत्र आल्यास त्यांचे ॲमिलॉईड बिटा प्लेक्सचे जाळे मेंदूमध्ये तयार होते. त्यामुळे मेंदूमधून वाहणाऱ्या संवेदनांची देवाण-घेवाण करण्याचे कार्य सुरळीत होत नाही.’’
डॉ. सोनवणे, श्री. बराले आणि सहकाऱ्यांनी ॲमिलॉईड बिटा पेप्टाईडस् यांना तोडणारी काही वितंचके (एन्झाईमस्) यावर संशोधन करून त्यांची कार्य करण्याची पद्धती प्रसिद्ध केली. तसेच सूक्ष्मजीवांमधून अशा प्रकारच्या नवीन वितंचकांचाही शोध लावला. ड्रग डिझाईन्सच्या माध्यमातून ॲमिलॉईड बीटा पेप्टाईडस् यांना एकत्रित करण्यापासून रोखणारी लहान प्रथिने किंवा नवीन औषधे शोधण्याचे काम जीव-रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. डॉ. सोनवणे, श्री. बराले, सागर बर्गे, मारुती धनवडे, चिदंबर जलकुटे, सुबोध कांबळे, संगणक केंद्रातील सर्व सहकाऱ्यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, डॉ. डी. टी. शिर्के यांचे सहकार्य लाभले.
वडणगेच्या बरालेंची भरारी
वडगणे (ता. करवीर) येथील सागर बराले यांनी एमएस्सी पूर्ण केली असून, सध्या ते डॉ. सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी करत आहेत. अल्झायमर रोगावरील संशोधनासाठी ते अडीच वर्षे काम करत आहेत. ते सामान्य कुटुंबातील आहेत. वडील शिवाजी बराले हे प्रसिद्ध सुतार असून टिंबर मार्केट येथे काम करतात.

from News Story Feeds https://ift.tt/2RfLjbX
Comments
Post a Comment