Artificial Intelligence मानवी भविष्यासाठी धोकादायक, अर्ध्याहून अधिक अमेरिकन लोकांचं मत, पाहा खास सर्व्हे

​Artificial Intelligence is Dangerous Says Survay : सद्यस्थितीला जगभरातील टेक दिग्गज AI शर्यतीत एकमेकांना मागे टाकण्यासाठी स्पर्धा करत आहेत. दररोज AI जगतात नवनवीन शोध लागत आहेत. मागील काही महिन्यांपासून टेक्नोलॉजीच्या जगात तर AI चॅटबॉट ChatGPT ची तुफान चर्चा होताना दिसत आहे. ओपनएआयचा हा चॅटजीपीटी चॅटबॉट आतापर्यंतचा सर्वात जलद डाऊनलोड होणारं अॅप्लिकेशन बनलं आहे. ChatGPT ने एक प्रकारची AI शर्यत सुरू केली आहे, ज्यामध्ये Microsoft आणि Google सारख्या टेक दिग्गजांनी एकमेकांच्या AI उपलब्धींना मागे टाकण्यासाठी स्पर्धा केली आहे.पण या सर्वातही अर्ध्यापेक्षा जास्त अमेरिकन लोकांना AI च्या नकारात्मक प्रभावांबद्दल चिंता आहे आणि ६१% लोकांचा असा विश्वास आहे की यामुळे मानवी भविष्याला धोका निर्माण होऊ शकतो. एका सर्व्हेतून हे सारंकाही समोर आलं आहे.

from Science and Technology News in Marathi | विज्ञान-तंत्रज्ञान माहिती https://ift.tt/dMEmsY3

Comments

clue frame