Valentine’s Day Sale : iPhone 14 वर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, पाहा ऑफर

iPhone 14 Price cut in india : Apple ने सप्टेंबर २०२२ मध्ये iPhone 14 Series वरून पडदा हटवला होता. या सीरीज मध्ये चार प्रीमियम डिव्हाइस कंपनीने मार्केटमध्ये उपलब्ध केले होते. यात iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iphone 14 Pro Max या फोनचा समावेश होता. आयफोन १४ सीरीजला देशात ७९ हजार ९०० रुपयाच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते. Valentine’s Day निमित्त सुरू करण्यात आलेल्या ऑनलाइन सेल मध्ये आयफोन १४ वर मोठी सूट दिली जात आहे. ग्राहक या फोनला ४३ हजार ९०० रुपये किंमतीत घरी घेवून जावू शकतात, पाहा सर्व ऑफर्ससंबंधी. भारतात अॅपल -ऑथराज्ड थर्ड-पार्टी सेलर मध्ये Imagine सर्वात मोठे रिटेलर मध्ये सहभागी आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या Valentine’s Day sale मध्ये आयफोन १४ आणि आयफोन १४ प्लस वर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. ग्राहकांना या फोनवर कार्ड कॅशबॅक, डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर दिली जात आहे.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/j3Skyt9

Comments

clue frame