Validity Plans : आजकाल अनेक युजर्स लॉंग व्हॅलिडिटीसह येणारे प्लान्स खरेदी करण्यास प्राधान्य देतात. याचा प्रमुख फायदा म्हणजे, सतत रिचार्ज करण्याचे टेन्शन राहत नाही. तुम्हाला वारंवार रिचार्ज करण्याचा त्रास नको असेल तर, तुम्ही ८४ दिवसांच्या प्लानचा विचार करू शकता. २०२३ मध्ये, एअरटेल भारतातील ग्राहकांसाठी ८४ दिवसांच्या वैधतेसह चार प्रीपेड प्लान्स ऑफर करत आहे. एअरटेलच्या या चार अमर्यादित प्रीपेड प्लान्सची किंमत ४५५ रुपये, ७१९ रुपये, ८३९ रुपये आणि ९९९ रुपये आहे. आज आम्ही तुम्हाला या चार प्लानमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांविषयी सविस्तरपणे माहिती देणार आहोत, जेणेकरून तुमच्यासाठी कोणता प्लान बेस्ट आहे हे तुम्ही सहजपणे ठरवू शकता. यातील काही प्लान्समध्ये RewardsMini सबस्क्रिप्शन, तीन महिन्यांसाठी Apollo 24x7, FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि मोफत विंक म्युझिक यासारखे फायदा देखील मिळतात.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wNpth9x
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/wNpth9x
Comments
Post a Comment