सरकारी काम असो की खासगी काम असो. किंवा ओळखपत्र म्हणून सुद्धा आधार कार्ड आता आवश्यक झाले आहे. त्यामुळे मुला मुलीच्या जन्मानंतर लगेच आधार कार्ड काढले जात आहेत. परंतु, तुम्ही आधार कार्ड काढून १० वर्ष पूर्ण झाली असतील तर त्याला अपडेट् करणे गरजेचे आहे. भारतीय यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी प्राधिकरण (UIDAI) ने लोकांना आग्रह केला आहे की, जर त्यांच्या आधार कार्डला १० वर्ष पूर्ण झाले असतील तर त्यांनी एक अपडेट करणे गरजेचे आहे. १० वर्ष पूर्ण झालेल्या आधार कार्डसंबंधीचे डिटेल्स अपडेट करणे गरजेचे आहे. नुकतेच सार्वजनिक सल्ल्यात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने ज्या भारतीय रहिवासींनी गेल्या १० वर्षात आपले आधार कार्डला अपडेट केले नाही. त्यांना सरकारी डेटाबेस मध्ये माहिती कायम ठेवण्यासाठी या डॉक्यूमेंट्सला अपडेट करणे गरजेचे आहे. आधार कार्ड हे डॉक्यूमेंट्स सध्या खूप गरजेचे झाले आहे.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Kh1lQTk
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Kh1lQTk
Comments
Post a Comment