Best Budget Smartwatches: Croma Festival of Dreams टाटाच्या रिटेल शॉपिंग स्टोअर क्रोमा येथे सुरू झाला आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने कंपनी घरगुती उपकरणे, स्मार्टफोन, टीव्ही, लॅपटॉप आणि इतर उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. दुसरीकडे, जर तुम्हाला नवीन ब्लूटूथ स्मार्ट घड्याळ घ्यायचे असेल तर, तुम्ही खूप खर्च न करता ३००० रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करू शकता. युजर्स ही उत्पादने क्रोमाच्या ऑनलाइन शॉपिंग स्टोअरमधून तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअरमधून प्रचंड सूट देऊन खरेदी करू शकतात. सेल २ जानेवारी २०२३ पर्यंत चालेल. युजर्स तीन प्रकारच्या सवलतींचा लाभ घेऊ शकतात. कंपनी रेड, ग्रीन आणि व्हाइट डिस्काउंट देत आहे. याशिवाय, HDFC बँकेच्या ग्राहकांना वेगळ्या सवलतीचा लाभ मिळणार आहे. ग्राहक EMI पर्यायांसह खरेदी देखील करू शकतात. सेलमध्ये उपलब्ध ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचवर एक नजर टाकूया.
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ul5YqSC
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/Ul5YqSC
Comments
Post a Comment