जबरदस्त ! iPhone 14, iPhone 13, iPhone 12 स्वस्तात खरेदीची संधी, Flipkart वर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू

iPhone Offers: आयफोन खरेदीची इच्छा पूर्ण करण्याची जबरदस्त संधी आता तुमच्याकडे आहे. लोकप्रिय शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर ब्लॅक फ्रायडे सेल सुरू झाला आहे. २५ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा सेल ३० नोव्हेंबरपर्यंत प्लॅटफॉर्मवर चालणार असून यादरम्यान ग्राहकांना मोठ्या सवलतींचा लाभ मिळत आहे. विशेष बाब म्हणजे, या सेलमध्ये लेटेस्ट Apple iPhone 14 मॉडेल्सवर सवलतही उपलब्ध आहे आणि बँक किंवा एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेता येईल. तुम्ही अगदी कमी किमतीत जुने iPhone देखील खरेदी करू शकाल. आयफोन मॉडेल्सवर उपलब्ध असलेल्या बँक ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, Citi क्रेडिट आणि डेबिट कार्ड, ICICI बँक क्रेडिट कार्ड, कोटक बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डसह पेमेंट केल्यास २००० रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट दिली जात आहे. तसेच, जुना फोन एक्स्चेंज करून ग्राहकांना १७,५०० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Sh9LER

Comments

clue frame