Best 5G Phone under 20000 rupees : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबर २०२२ रोजी देशात ५जी सर्विस अधिकृतपणे लाँच केली आहे. आता टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल लागोपाठ देशात ५जी नेटवर्क रोलआउट करीत आहे. २५ नोव्हेंबर रोजी रिलायन्स जिओने गुजरातमधील सर्वच्या सर्व म्हणजेच ३३ जिल्ह्यात आपली ५जी सर्विस उपलब्ध केली आहे. याशिवाय, देशातील अनेक शहरात आता ५जी सर्विस उपलब्ध केली जात आहे. तुमच्या शहरात जर ५जी नेटवर्क मिळत असेल आणि तुम्हाला जर ५जी सपोर्ट असलेला स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी काही स्वस्त किंमतीतील स्मार्टफोन्सची लिस्ट, त्याची किंमत आणि फीचर्स संबंधी माहिती देत आहोत. या फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये सॅमसंग, शाओमी, पोको, मोटोरोला आणि विवो कंपनीच्या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. या सर्वच्या सर्व फोन संबंधी सर्वकाही जाणून घ्या.
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8xjLSqi
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/8xjLSqi
Comments
Post a Comment