भारी ऑफर! ३० हजारांचा शानदार स्मार्ट टीव्ही फक्त ८ हजारात होईल तुमचा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट वर आजपासून (१२ मार्च) Big Saving Days सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्ही कापड, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि स्मार्टफोन्स सारख्या प्रोडक्ट्सला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता. तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या फायद्याचा ठरेल. या सेलमध्ये तुम्ही ४२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीला खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. सेलमध्ये च्या ३० हजार रुपयांच्या ४२ इंच स्मार्ट टीव्हीला तुम्ही ८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. या ऑफरविषयी जाणून घेऊया. वाचा: Blaupunkt Cybersound 106 cm (42 inch) Full HD LED वर ऑफर Blaupunkt Cybersound 106 cm (42 inch) Full HD LED Smart Android TV ची मूळ किंमत २९,९९९ रुपये आहे. मात्र, बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये स्मार्ट टीव्ही ३३ टक्के डिस्काउंटनंतर १९,९९९ रुपयात उपलब्ध आहे. तुम्ही या टीव्हीला एसबीआयचे क्रेडिट कार्ड वापरून खरेदी केल्यास १० टक्के म्हणजेच १,२५० रुपये कॅशबॅकचा फायदा मिळेल. अशाप्रकारे टीव्हीची किंमत कमी होवून १८,७४९ रुपयांवर येईल. Blaupunkt च्या या टीव्हीवर तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळत आहे. ही ऑफर जुन्या टीव्हीच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास हा टीव्ही फक्त ७,७४९ रुपयात तुमचा होईल. Blaupunkt Cybersound 106 cm (42 inch) Full HD LED Smart Android TV चे फीचर्स Blaupunkt Cybersound 106 cm (42 inch) Full HD LED Smart Android TV हा अँड्राइड ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. यामध्ये गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट सारखे फीचर्स दिले आहेत. हा टीव्ही ४२ इंच फुल एचडी एलईडी डिस्प्लेसह येतो. याचे रिझॉल्यूशन १९२०x१०८० पिक्सल आणि रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात ४० वॉटचे साउंड आउटपूट मिळतात. तसेच, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि युट्यूब सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील मिळेल. याशिवाय, अनेक शानदार फीचर्स या टीव्हीत दिले आहेत. दरम्यान, फ्लिपकार्टवरील सेल १६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/EpIAxXR

Comments

clue frame