१ महिन्याकरिता फ्री सर्व्हिस किंवा WiFi राउटर, तुमच्या आवडीनुसार करा निवड, पाहा ACT चा 'हा' ब्रॉडबँड प्लान
नवी दिल्ली: इंटरनेट सेवा प्रदाता ने युजर्ससाठी एक अतिशय उत्तम ऑफर आणली आहे. या ऑफर अंतर्गत तुम्ही एक महिन्याची मोफत सेवा किंवा मोफत वाय-फाय राउटर निवडू शकता. म्हणजेच, तुम्हाला एक गोष्ट मोफत मिळेल. हे निश्चित आहे. आता तुम्ही विचार करत असाल की ऑफर छान आहे. पण, या ऑफरचा फायदा कसा घ्यायचा, तर काळजीचे कारण नाही. आज आम्ही तुम्हाला या ऑफरशी संबंधित संपूर्ण माहिती देऊ. या ऑफरचा लाभ ACT ४० Mbps ब्रॉडबँड प्लानवर दिला जात आहे. परंतु, जेव्हा युजर ६ महिन्यांसाठी प्लान खरेदी करेल तेव्हाच याचा लाभ मिळेल. आता जर तुम्हाला या प्लानच्या मासिक किमतीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असेल, तर या प्लॅनचे मासिक शुल्क ५४९ रुपये आहे. या प्लानमध्ये किती डेटा उपलब्ध आहे किंवा कोणते फायदे दिले जातात, आता आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देऊ. वाचा: Offers: ACT 40 Mbps ब्रॉडबँड प्लानसह, युजर्सना काही अतिरिक्त फायद्यांसह ५०० GB हाय-स्पीड डेटा देखील दिला जातो. म्हणजेच सहा महिन्यांसाठी प्लानची किंमत ३२९४ रुपये आहे (जीएसटीशिवाय, जीएसटी अतिरिक्त असेल). अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी ६ महिन्यांचा प्लान एकत्र घेऊन विनामूल्य इंस्टॉलेशन ऑफर करत आहे. डेटा मर्यादा गाठल्यानंतर, वेग ५१२ Kbps पर्यंत कमी होईल.आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही एकतर मोफत वाय-फाय राउटर किंवा एक महिना मोफत सेवा मिळवू शकता. तुम्ही एक महिन्याची मोफत सेवा निवडल्यास, तुम्हाला एकूण ७ महिन्यांची सेवा मिळेल ती सुद्धा ३२९४ रुपयांमध्ये (जीएसटी शुल्काशिवाय). त्याच वेळी, तुम्ही वाय-फाय राउटर निवडल्यास, तुम्ही या किमतीत ६ महिन्यांसाठी सेवेचा लाभ घेऊ शकाल. ७ महिन्यांनुसार ही डील नक्कीच चांगली आहे. कारण, ७ महिन्यांसाठीचे प्लानचे मासिक शुल्क ४७० रुपये होते. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/i1CxBtw
Comments
Post a Comment