कन्फर्म ! 'या' दिवशी भारतात येणार Vivo चा शानदार Vivo V23e 5G, पाहा स्पेसिफिकेशन्स

नवी दिल्ली: च्या भारतात लाँचची तारीख निश्चित झाली आहे. Vivo V23e 5G भारतात पुढील आठवड्यात लाँच होणार असून Vivo V23e 5G चे मायक्रोसाइट देखील Vivo India साइटवर लाइव्ह झाले आहे. Vivo V23e सह अल्ट्रा स्लिम ग्लास डिझाइन उपलब्ध असेल. याशिवाय, फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर उपलब्ध असेल. वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले Vivo V23e 5G सह उपलब्ध असेल. Vivo V23e 5G गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये थायलंडमध्ये लाँच झाला होता. Vivo V23e 5G भारतात २१ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता लाँच होईल. थायलंडमध्ये Vivo V23e ची किंमत ८,४९०,००० व्हिएतनामी डोंग आहे, म्हणजे सुमारे २७,८०० रुपये. फोन फक्त ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज वेरिएंटमध्ये खरेदी करता येईल. भारतीय बाजारपेठेत त्याची किंमतही याच श्रेणीत असू शकते. वाचा: Vivo V23e मध्ये Android 11 आधारित Funtouch OS 12 आहे. फोनमध्ये १०८० x२४०० पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.४४ -इंच फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio G96 प्रोसेसर, ८ GB पर्यंत रॅम आणि १२८ GB स्टोरेज आहे. Vivo V23e चा कॅमेरा देखील जबरदस्त आहे. या विवो फोनमध्ये तीन रियर कॅमेरे आहेत, ज्यामध्ये प्रायमरी लेन्स ६४ मेगापिक्सेल आहे, ज्यामध्ये अपर्चर f/१.७९ आहे. दुसरा लेन्स ८ मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे. तिसरा लेन्स २-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्स आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५०-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला अधिक पॉवर देण्यासाठी Vivo V23e मध्ये मजबूत बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, Vivo V23e मध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth v5.2, GPS/A-GPS आणि USB Type-C पोर्ट आहे. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे. Vivo V23e 44W पर्यंत जलद चार्जिंगसाठी समर्थनासह ४०५० mAh बॅटरी पॅक करते. या Vivo फोनचे वजन १७२ ग्रॅम आहे.स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी यात MediaTek Dimensity ८१० SoC सह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. कंपनीने काही दिवसांपूर्वीच Vivo T1 5G भारतात लाँच केला असून या स्मार्टफोनमध्ये तुम्ही उत्तम प्रकारे मल्टीटास्किंग करू शकता आणि तुम्ही बॅकग्राउंडमध्ये जवळपास २५ अॅप्स एकाच वेळी ओपन ठेवून त्यांचा वापर करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/pAXduP9

Comments

clue frame