Vivo चा सुपर स्लिम स्मार्टफोन Vivo T1 5G आज होणार लाँच, किंमत असणार प्रत्येकाच्या बजेटमध्ये, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: स्मार्टफोन आज एका ऑनलाइन कार्यक्रमादरम्यान भारतात लाँच करण्यात येणार आहे. कंपनीच्या टी सीरीज अंतर्गत हा नवीन स्मार्टफोन असेल. हा स्मार्टफोन तरुणांच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. तसेच,अशा फीचर्सचा समावेश त्याच्या फीचर्स आणि डिझाइनमध्ये करण्यात आला आहे. जो, तरुणांच्या पसंतीस उतरणार आहे. Vivo T1 5G हा स्मार्टफोन युजर्सना टर्बो परफॉर्मन्स देईल आणि हे वैशिष्ट्य या स्मार्टफोनचा यूएसपी बनू शकते. Vivo ने हे देखील उघड केले आहे की, Vivo T1 5G लॉन्च झाल्यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट वर उपलब्ध होईल. या स्मार्टफोनच्या भारतीय प्रकाराच्या मागील बाजूस, ग्राहकांना मागील बाजूस ट्रिपल-कॅमेरा सेटअपसह आयताकृती कॅमेरा मॉड्यूल दिले जाईल. यात कूलिंग सिस्टीम आणि "टर्बो स्क्रीन" देखील असेल, जी उच्च रिफ्रेश दर समर्थन दर्शवते. वाचा: कंपनीने आधीच सूचित केले आहे की, स्मार्टफोनची किंमत सुमारे २०,००० रुपये असू शकते. भारतात स्मार्टफोनसाठी ही किंमत १९,००० ते २३,००० रुपयांदरम्यान असू शकते. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाँचनंतरच फोनची खरी किंमत कळेल. Vivo T1 5G मध्ये ६.५८ इंच FHD+ LCD स्क्रीन 120Hz च्या रीफ्रेश रेटसह आणि २४० Hz च्या टच सॅम्पलिंग रेटसह देण्याची अपेक्षा आहे. जर प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर, स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. यात तीन LPDDR4x RAM पर्याय समाविष्ट असू शकतात. जे, ४ GB RAM, ६ GB RAM आणि ८ GB RAM तसेच १२८ GB UFS 2.2 स्टोरेज असू शकतात. हा स्मार्टफोन ५, ००० mAh बॅटरी आणि १८ W फास्ट चार्जिंगसह येऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/17TQUEv
Comments
Post a Comment