धमाकेदार ऑफर! रिचार्जच्या किंमतीत खरेदी करता येईल Samsung चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन; मिळतात जबरदस्त फीचर्स

नवी दिल्ली: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म वर दर आठवड्याला नवनवीन सेलचे आयोजन केले जाते. तुम्ही जर नवीन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर फ्लिपकार्टवरील एक सेल तुमच्या फायद्याचा ठरेल. फ्लिपकार्टवर सुरू असून, या सेलमध्ये तुम्हाला स्मार्टफोन्स खूपच स्वस्तात मिळतील. फ्लिपकार्टवर Samsung, Apple, Xiaomi, Oppo सारख्या कंपन्यांच्या स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्सचा फायदा मिळेल. या सेलमध्ये सॅमसंगच्या फोनला तुम्ही फक्त ५० रुपयात खरेदी करू शकता. सेलमध्ये स्मार्टफोनवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळेल. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचाः SAMSUNG Galaxy F22 ची किंमत आणि ऑफर्स Galaxy F22 स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १६,९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये २ हजार रुपयांच्या डिस्काउंटनंतर फक्त १४,९९९ रुपयात उपलब्ध आहे. यानंतर फोनवर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल, त्यामुळे फोनची किंमत अजून कमी होईल. स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल. या फोनची किंमत १३,९९९ रुपयांवरून येईल. SAMSUNG Galaxy F22 वर १३,९५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. तुम्ही जुना फोन देऊन एक्सचेंज ऑफरचा लाभ घेऊ शकता. मात्र, ही ऑफर जुन्या फोनच्या मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. पूर्ण ऑफरचा लाभ मिळाल्यास या फोनला फक्त ४९ रुपयात खरेदी करू शकता. Samsung Galaxy F22 चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स गॅलेक्सी एफ२२ स्मार्टफोनमध्ये ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणारा ६.४ इंच HD + sAMOLED डिस्प्ले दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात क्वाड कॅमेरा सेटअप दिला असून, यात ४८ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा आणि दोन २-२ मेगापिक्सलचा कॅमेरे मिळतात. फोनमध्ये १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी १५ वॉट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोनमध्ये साइड-माउंटेड सेंसर दिला आहे. याशिवाय, कनेक्टिव्हिटीसाठी ४जी एलटीई आणि यूएसबी-टाइप सी सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/CTLOZqH

Comments

clue frame